पाच जणाविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल
https://buldhananews.com बहुतांश ठिकाणी जुन्या भांडणावरुन वाद होण्याचे प्रमाण वाढत आहे. असेच प्रकार बुलढाणा जिल्हयात देखील घडत आहेत. अश्या प्रकारामुळे एकमेकांना मारहाण केल्याच्या घटना देखील नेहमी घडत आहेत. अशीच काहीशी घटना खामगाव तालुक्यातील कदमापूर घडली. ही घटना बुधवाद दि.11 ऑक्टोंबर रोजी दुपारी घडली या भांडणामध्ये जुन्या भांडणाच्या कारणावरुन वाद असल्याचे कदमापूर गावात बोलल्या जात आहेत.
परंतु मंगळवार, दि.17 ऑक्टोंबर रोजी खामगाव ग्रामीण पोलिसांनी पाच जणांविरुध्द दंगलीचे गुन्हे दाखल केले आहे. सौ.सुजाता अक्षय इंगळे वय 24 रा. कदमापूर या महिलेने खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी व माझे पती गावातील यात्रेमध्ये आकाश पाळण्याजवळ उभे असताना. त्यावेळी स्वप्ना बाबुराव सावदेकर, शालु बाबुराव सावदेकर, बाबुराव सावदेकर, काजल सावदेकर, विशाल भास्कर इंगळे हे तेथे आले व त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून आमच्यासोबत वाद केला व मला व पतीला लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली.
या भांडणात माझ्या गळ्यातील सोन्याची साखळी पोथ वजन अंदाजे 24 ग्रॅम किंमत 80 हजार रुपये स्वप्ना सावदेकर व माझ्या सासुच्या गळ्यातील सोन्याची दोन डोरले असलेली काळे मनी व मधात बारीक साखळी असलेली सोन्याची पोथ वजन 10 ग्रॅम किंमत 40 हजार रुपये किंमतीची बाबुराव सावदेकर याने तोडून हिसकावून घेतली.
याबाबत खामगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपी स्वप्ना सावदेकर, शालु सावदेकर, बाबुराव सावदेकर, काजल सावदेकर, विशाल भास्कर इंगळे यांच्या विरुध्द कलम 143, 147, 149, 327, 323, 504, 506 भादंविचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गाडेकर हे करीत आहे.
शेतकरी बांधवांनो तुम्हाला शेतमाल तारण कर्ज योजना माहिती आहे का?