दि. 13 ऑक्टोबर रोजी महिला आयोग आपल्या दारी उपक्रम
महिलांनी जनसुनावणीसाठी उपस्थित राहावे – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
बुलढाणा न्यूज -महिलांना त्यांच्या तक्रारी स्थानिकस्तरावर मांडण्यासाठी महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील तक्रारींची जनसुनावणी शुक्रवार, दि. 13 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात घेण्यात येणार आहे. शासकीय विभागाकडील किंवा कौटुंबिक हिंसाचार संदर्भातील प्रलंबित तक्रारीबाबत किंवा नवीन लेखी तक्रार नोंदवून सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
महिला संदर्भातील तक्रारीसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे कार्यालय मुंबई येथे असल्यामुळे महिलांना त्या ठिकाणापर्यंत पोहोचणे अडचणीचे होते. महिलांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर जनसुनावणीसाठी उपस्थित राहणार आहेत. तक्रारदार पीडित महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत व्हावी, कोणतीही पीडित महिला कोणतीही पूर्व सूचना न देता थेट सुनावणीस उपस्थित राहून आपली लेखी समस्या आयोगापुढे मांडू शकणार आहे. या सुनावणीसाठी महिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे शुक्रवारी बुलढाणा जिल्हयात
ग्रामीण अर्थव्यवस्था तयार करण्यासाठी सोसायटीचे जाळे असणे आवश्यक