अपहरण प्रकरणातील दोन आरोपींना अटक; दोघे जण फरार

चौघांवर अपहरणासह आदी गुन्हे दाखल

        बुलढाणा न्यूज – मोताळा तालुक्यात जुन्या भांडणातून बोराखेडी येथील एका बत्तीस वर्षीय युवकाचे अपहरण केले आहे. ही घटना गुरुवार, दि.5 ऑक्टोबर रोजी घडली होती. याप्रकरणी चौघांवर अपहरणासह आदी गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यातील अमोल गवई यास बुलढाणा तर वैभव गिरी याला मलकापूर येथून शुक्रवार, दि.6 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. तर दोन आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.
         जुन्या भांडणाच्या वादातून मोताळा तालुक्यात हिमांशु झंवर मोताळा, अमोल गवई रा.बुलढाणा व इतर दोघांनी संगणमत करुन शेख आरीफ शेख सत्तार रा.बोराखेडी यास पैसे न दिल्याने आरिफ व त्याचा मित्र राजू खरात हे मोताळा येथील साईराम ढाबा येथे बसलेले असताना हिंमांशु व इतर तिघांनी त्याचा खून करण्याच्या उद्देशाने गुरुवार, दि.5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास चारचाकी वाहनात बळजवरी डांबून अपहरण केलं, अशी तक्रार गोकुळ खरात याने पोलीस स्टेशन बोराखेडीला दिल्यावरून वरील आरोपींविरुध्द विविध कलमान्वये गुरुवार, दि.5 ऑक्टोबर 2023 च्या उशीरा रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. या अपहरण प्रकरणातील 2 आरोपींना बोराखेडी पोलिसांनी सापळा रचून बुलढाणा व मलकापूर येथून अटक केली आहे. तर हिमांशु झंवर व एका आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक राजवंत आठवले हे करीत आहेत. फरार आरोपींचा शोध बोराखेडी पोलीस घेत आहे, लवकरच त्यांना देखील अटक करण्यात येईल असा विश्वास बोराखेडी पोलीसांनी व्यक्त केला आहे.

आंतरराष्ट्रीय नायजेरीयन सायबर गुन्हेगारांना बुलढाणा पोलीसांनी दिल्ली येथुन केली अटक

हिवाळी 2023 पर्यावरण अभ्यास विषयाची परीक्षा शनिवार दि.18 नोव्हेंबर रोजी होणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें