सरकारच्या नाकर्तेपणाच्या विरोधात बुलढाणा जिल्ह्यातील दोन हजार आशा व गटप्रवर्तकांनी केले जेलभरो आंदोलन

Two thousand Asha and group promoters of Buldhana district staged a jail-wide protest against the government’s inaction

 

सोमवारला 75 हजार आशा व गटप्रवर्तक मुंबई आझाद मैदानावर धडकणार

On Monday, 75 thousand Asha and group promoters will strike at Mumbai Azad Maidan

आशा व गटप्रवर्तक

             आज पासून दिवाळी सारखा मोठा सण सुरू होत असताना गेल्या तीन महिन्यापासून या आशा व गटप्रवर्तकांचे मानधन थकीत आहे. सरकारने या प्रश्नांची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा सोमवार, दि.13 नोव्हेंबर रोजी राज्यातील 75 हजार आशा व गटप्रवर्तक ह्या मुंबई आझाद मैदानावर धडकणार आहेत. त्याची तयारी जिल्ह्यातील दोन हजार आशा व गटप्रवर्तकांनी करावी, असे आवाहन ही यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ.पंजाबराव गायकवाड यांनी आशा व गटप्रवर्तकांना केले.

              बुलढाणा न्यूज –  गटप्रवर्तकांचे कंत्राटी कर्मचार्‍यां प्रमाणे सेवेत समायोजन, ऑनलाईन कामाची सक्ती बंद करा, किमान वेतन 26 हजार रुपये लागू करा, दिवाळी बोनस देण्यात यावे आणि सामाजिक सुरक्षा लागू करा इत्यादी मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दि.9 नोव्हेंबर 2023 रोजी सरकारच्या नाकर्तेपणाच्या विरोधात सीटूचे जिल्हा अध्यक्ष कॉ.पंजाबराव गायकवाड यांच्या नेतृत्वात घोषणाबाजी करून जिल्ह्यातील दोन हजार संतप्त आशा व गटप्रवर्तकांनी स्वतःला अटक करून घेत जेलभरो केले.

18 ऑक्टोबर 2023 पासून राज्यातील 75 हजार आशा व गटप्रवर्तक आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संपावर गेलेले आहेत. सोबतच 35 हजार कंत्राटी कर्मचारी सुद्धा संपावर आहेत, अशा परिस्थितीत राज्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणा पूर्णपणे ठप्प झालेली असताना सरकार मात्र या कर्मचार्‍यांच्या प्रश्नांकडे कमालीचे दुर्लक्ष करीत आहे. यावरून सरकार सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यांबाबत किती गंभीर आहे हे दिसून येते.

एकीकडे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आभा कार्ड काढण्याची स्पर्धा राज्या राज्यांत सुरू आहे. तर दुसरीकडे आपल्या राज्यातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे. आरोग्य मंत्र्यांनी बुधवार, दि.1 नोव्हेंबर 2023 रोजी संघटनेच्या कृती समिती सोबत चर्चा करून आशा वर्कर्सला 7 हजार रूपये तर व गटप्रवर्तकांना 6200 मानधनात वाढ आणि दोन हजार रुपये दिवाळी बोनस देण्याची घोषणा केली. परंतु आठ दिवस उलटून गेल्यावर सुद्धा त्यासंबंधीचे लेखी आदेश काढलेले नाहीत. गटप्रवर्तकांच्या समायोजनाबाबत मात्र सरकार प्रचंड उदासीन दिसून येत आहे. याच प्रश्नांना घेऊन आज पर्यंत जिल्ह्यातील तेरा ही तालुक्यात सीटूच्या नेतृत्वात जोरदार आंदोलने झालीत. आज सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सीटू चे जिल्हाध्यक्ष कॉ.पंजाबराव गायकवाड यांच्या नेतृत्वात जेलभरो करण्यात आले.

              जेल भरो आंदोलनांमध्ये सीटूचे जिल्हाध्यक्ष कॉ. पंजाबराव गायकवाड, सचिव सुरेखा पवार, उपाध्यक्ष रश्मी दुबे, राज्य कौन्सिल मेंबर जयश्री तायडे, राज्य सचिव ललिता बोदडे, स्वाती वायाळ, सीमा जाधव, सविता मस्के, कविता चव्हाण, विजया ठाकरे, शारदा लिंगायत, उर्मिला माठे, सीमा उमाळे, अलका राजपूत, रूपाली गावंडे, शोभा बगाडे, सीमा शेळके, वर्षा शेळके, प्रतिभा बानाईत, राजश्री नेमाडे, मंदा मसाळ, ज्योती डुकरे, अनिता कदम, सुमित्रा लिहिणार, सरिता मस्के, निर्मला माघाडे, सिंधू अवसरमोल, योगिता नरवाडे, शांता सपकाळ, रेखा जायभाये, सविता हरकाळ, वैशाली हिवाळे, स्वाती पांडे इत्यादी सह 2 हजार आशा व गटप्रवर्तकांनी स्वतः ला अटक करून जेल भरो केले.

 

8 नोव्हेंबर रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत हे घेण्यात आले निर्णय

स्वयं सहाय्यता महिला बचत गटांनी उद्योजक व्हावे-  मुख्याधिकारी गणेश पांडे यांचे आवाहन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें