Asha and group promoters warned to protest in jail on Thursday
बुलढाणा न्यूज – जिल्हा स्तरावर बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयर समोर गुरुवार, दि.9 नोव्हेंबर रोजी मोर्चा काढून रस्ता रोको करण्यात येऊन जेलभरो करण्याचे आवाहन कॉ.पंजाबराव गायकवाड यांनी जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तकांना केले आहे.
बुधवार, दि.1 नोव्हेंबर रोजी आरोग्य मंत्री श्री.तानाजी सावंत यांनी आरोग्य भवन, मुंबई येथे आशा व गटप्रवर्तकांच्या काही पदाधिकार्यांसोबत बैठक घेऊन आशा वर्करच्या मानधनात सात हजार व गटप्रवर्तकांच्या मानधनात 6 हजार 200 रूपयांची वाढ आणि दिवाळी बोनस म्हणून 2 हजार रूपये देण्याची घोषणा केली. परंतू लिखित स्वरूपाचे कुठलेही पत्र संघटनेला दिलेले नाही. तसेच गटप्रवर्तकांच्या कायम सेवेत समायोजन करण्याबाबत कुठलीही सकारात्मकता दाखविली नाही. यासोबत ऑनलाईन कामाची जी सक्ती मोठ्या प्रमाणात आज राज्यात आशा व गटप्रवर्तकांना केली जाते . त्याबद्दल कुठलाच निर्णय घेतला नसून या वरून आरोग्य मंत्र्यांची हि घोषणा केवळ कृति समितीचा दि.18ऑक्टोबर पासून बेमुदत संप सूरू आहे.त्याला कुठेतरी खिळ घालण्याचा हा प्रकार तर नाही ना? अशी शंका निर्माण होण्यास वाव मिळतो असा आरोप बुलडाणा जिल्हा सीटूचे जिल्हा अध्यक्ष कॉ. पंजाबराव गायकवाड Punjabrao Gaikwad यांनी मंगळवार, दि.7 नोव्हेंबर 2023 रोजी सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मस्थळपासुन ते पंचायत समिती पर्यंत तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांच्या नेतृत्वात घोषणाबाजी करून मोर्चा काढण्यात आला. जो पर्यंत गट प्रवर्तकांचे समायोजन, ऑनलाईन काम बंद आणि 5 हजार रूपये दिवाळी बोनस , किमान वेतन, आणि सामाजिक सुरक्षा इत्यादी बाबत लेखी पत्र सरकारकडून संघटनेला मिळत नाही तोपर्यंत संघटना संपावर ठाम आहे.
ठरल्या प्रमाणे बुलढाणा जिल्ह्यात नियोजित असलेले आंदोलने चालूच ठेवण्याचा निर्णय सीटू संलग्न आशा व गटप्रवर्तक संघटनेने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून नियोजित असलेले सिंदखेड राजा येथे आंदोलन करण्यात आले.जिल्हयातील सर्व 13 ही तालुक्यात संघटनेच्या वतीने संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
लवकरच एक-दोन दिवसात मुंबई अथवा आरोग्य मंत्री ना.श्री.सावंत यांच्या घरावर राज्यातील आशा व गटप्रवर्तकांचा प्रचंड मोर्चा काढण्याचे नियोजन संघटनेच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणीही आशा व गटप्रवर्तकांनी चूकीचा निर्णय घेऊन त्याचा आपल्या संपावर परिणाम होईल अशा प्रकारचे पाऊल उचलू नये असे आवाहन सुद्धा संघटनेच्या वतीने करण्यात आले.
यावेळी संघटनेच्या जिल्हा सचिव सुरेखा पवार, स्वाती वायाळ, सीमा जाधव, सिंधू अवसरमोल, सुमित्रा लिहीणार, स्वाती कदम,सरिता म्हस्के,शांता सपकाळ, शोभा मोतेकर,अनिता कदम,ज्योती काळे,निता कायदे, स्वाती पांडे, सविता सांगळे, वैशाली हिवाळे, सविता हरकाळ, रेखा जायभाये,नूतन झिने इत्यादी सह सिंदखेडराजा, दे.राजाआणि लोणार तालुक्यातील शेकडो आशा व गटप्रवर्तक सहभागी झाल्या होत्या.