बुलढाणा न्यूज – खामगाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे राबविण्यात आली. राज्य शासनाचा ग्राम स्वच्छतेबाबत महत्वाकांक्षी उपक्रमांत नागरिक, ग्रामस्थ, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी गडकिल्ले स्वच्छ करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात खामगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या पंधरा महिला आणि दहा पुरुष प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
या उपक्रमामध्ये किल्ल्यावरील गाजर गवत काढणे, प्लास्टीक पिशव्या गोळा करणे, किल्ल्याचा प्रदेश सपाटीकरण करणे, अनावश्यक झाडेझुडपे नष्ट करणे, कचरा गोळा करून नष्ट करण्यात आले. संस्थेचे प्राचार्य प्रकाश खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे उपप्राचार्य उदय चव्हाण, गटनिदेशक भारत राठोड, गटनिदेशक जितेंद्र काळे, गटनिदेशक विकास सुपे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रदीप बावस्कर, शिल्पनिदेशक विनोद तराळे, श्रीकांत बेलसरे, गजानन इंगळे, श्री. माटे, रवि डोंगे, श्री. सुरडकर, श्री. मरापे, श्री. पुजारी, राजेश सावनेर, गोपाल तेलंग आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
या उपक्रमास राज्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे संचालक दिगंबर दळवी, अगरावती विभागाचे सहसंचालक प्रदिप घुले यांचे प्रोत्साहन मिळाले.
ग्रामीण अर्थव्यवस्था तयार करण्यासाठी सोसायटीचे जाळे असणे आवश्यक
महिलांनी पुढाकार घेऊन तक्रारी मांडाव्यात – रुपाली चाकणकर Rupali Chakankar