राष्ट्रीय स्वंयसेवक संघ बुलढाणा नगराचा विजयादशमी उत्सव आज

पश्चिम क्षेत्र सेवाप्रमुख डॉ.उपेंद्र कुळकर्णी (संभाजीनगर) यांचे मार्गदर्शन लाभणार

बुलढाणा न्यूज
राष्ट्रीय स्वंयसेवक संघ शताब्दी वर्ष निमित्त बुलढाणा नगराचा राष्ट्रीय स्वंयसेवक संघ विजयादशमी उत्सव तथा शस्त्रपूजन आज रविवार ,दि.५ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे.

तसेच बुलढाणा नगरातून पथसंचलन चार वाजता प्रारंभ होणार आहे. बुलढाण्यातील येथील शारदा ज्ञानपीठ शाळेचे प्रांगण येथे उत्सव होणार असून या उत्सवाला प्रमुख वक्ते रा. स्व. संघ पश्चिम क्षेत्र सेवाप्रमुख डॉ.उपेंद्रजी दत्तात्रय कुळकर्णी (संभाजीनगर) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. प्रमुख अतिथी श्यामजी विजय पवार माजी उपजिल्हाधिकारी संचालक ध्रव ऑल्मपीयाड अ‍ॅण्ड फाऊंडेशन क्लासेस बुलढाणा राहणार आहेत. दरम्यान नगर पथसंचलन शारदा ज्ञानपीठ शाळेचे प्रागंण चार वाजता येथून प्रारंभ होवून तहसिल कार्यालयासमोरून संगम चौक, जयस्तंभ चौक, स्टेट बँक समोरून तहसिल चौक मार्गे पुन्हा शारदा ज्ञानपीठ प्रागंण येथे संघस्थानावर बौद्धिक कार्यक्रमात उपस्थित राहतील.

या विजयादशमी उत्सव तसेच पथसंचलनात उपस्थित रहावे असे आवाहन नगर संघ चालक महेश पेंडके, नगरकार्यवाह रविंद्र जाधव, सहकार्यवाह विवेक उबरहंडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें