सोन्याचे दागिने घालून मिरवणार्‍या कार्यकर्त्यांना अजितदादांनी दिल्या कानपिचक्या..

Ajitdada gave ear-rings to the activists who paraded around wearing gold ornaments.

साधना थोरात
बुलढाणा न्यूज

सोने हे आपल्या आईच्या, पत्नीच्या किंवा बहिणीच्या अंगावर शोभून दिसते. पुरुषांच्या अंगावर एवढे सोनं शोभून दिसत नाही. तुम्ही सोनं घातलं तर ते बैलाच्या गळ्यात साखळी घातल्यासारखं दिसतं, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चाकण येथ एका कार्यक्रमात दिला आहे. सद्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. चाकणमधील सोन्याचे दागिने घालून मिरवणार्‍या आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी कानपिचक्या दिल्या. आपल्या भाषणात बोलताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले की, लहानातल्या लहान माणसांपासून अनेक लोकांना सोन्याचे दागिने वापरायला आवडते. एखादा प्रसंग आलाच तर सोने गहाणही ठेवता येते. आपल्याकडे गोल्डन मॅन म्हणूनही काहींची ओळख आहे. कुणीतरी तर सोन्याचे कपडेही शिवले होतेे. पण ते सगळे अति होत आहे. सोने हे आपल्या आईच्या, पत्नीच्या किंवा बहिणीच्या अंगावर शोभून दिसते. पुरुषांच्या अंगावर एवढे सोने काही शोभून दिसत नाही त्यामुळे उगीचच त्या भानगडीत पडू नका, असा सल्ला अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. बैलाला साखळी घालतात तसे काहीजण सोन्याच्या साखळ्या घालून फिरतात, असा उपरोधित टोलाही त्यांनी यावेळी अजितदादांनी लगावला.
पुढे बोलताना अजितदादा पवार म्हणाले की, सर्व मंत्र्यांनी दौरे केलेत. शेतकर्‍यांचा रोष, नाराजी, राग, विरोध पाहायला मिळाला. जेव्हा घरदार उध्वस्त होतं, शेतीचं प्रचंड नुकसान होतं, जमीन वाहून जाते, तेव्हा साहजिक अशा प्रतिक्रिया उमटतात. पण आम्ही या शेतकर्‍यांना कशी मदत करता येईल, त्या अनुषंगाने निर्णय घ्यायचं ठरवलं आहेे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीचा दौरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना झालेल्या नुकसानीची माहिती दिली आहे. शेतकर्‍यांना जास्तीत जास्त मदत मिळावी अशी मागणी केलेली आहे. यासाठी विविध विभागांची मदत लागणार आहे. सरकार याबाबत बैठकीत निर्णय घेईल असे देखील त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें