अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाचे किरण सरनाईक यांचा कार्यकाळ डिसेंबर २०२६ मध्ये संपणार

शिक्षक मतदारसंघ निवडणूक; आज मतदार यादीची पहिली नोटीस जारी होणार

साधना थोरात
बुलढाणा न्यूज
राजकीय पक्ष, शिक्षक संघटना आणि अपक्ष इच्छुक उमेदवारांनी निवडणूकीसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघांच्या मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून, आज मंगळवारी, ३० सप्टेंबर २०२५ पहिली नोटीस जारी होणार आहेे. निवडणकू आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ही कार्यवाही सुरु झाली आहे.

असे आहे वेळापत्रक
पहिली नोटीस जारी: ३० सप्टेंबर
पुढील नोटीस : १५ व ३० ऑक्टोबर
अर्ज करण्याची अंतिम तारीख: ६ नोव्हेंबर
प्रारूप यादी प्रसिद्ध: २५ नोव्हेंबर
हरकती नोंदवण्याची अंतिम
तारीख: १२ डिसेंबर
अंतिम यादी प्रसिद्ध: ३० डिसेंबर
अशी राहणार आहे.

या निवडणुकत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ (विमाशिसं) आणि विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशन (विज्युक्टा), शिक्षक भारती या संघटना रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू हेदेखील या निवडणुकीत उतरण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाचे सध्याचे आमदार अपक्ष किरण सरनाईक आहेत. त्यांचा कार्यकाळ डिसेंबर २०२६ मध्ये संपणार आहे. गेल्या निवडणुकीत त्यांना १५,६०६ मते मिळाली होती. ही निवडणूक अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांमधील शिक्षकांसाठी महत्त्वाची आहे. राजकीय पक्षांसह विविध संघटना मैदानात उतरल्याने ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें