Buldhana news : चौथीतील विद्यार्थी विलक्षण कौशल्य आत्मसात करत आहेत- श्रीधर पल्हाडे

गिरीश पळसोदकर
खामगाव- २१ व्या शतकात जगण्यासाठी आवश्यक जीवनकौशल्ये, गणितीय मॉडेलिंग आणि संगणकीय विचार पद्धती विद्यार्थ्यांमध्ये रुजाव्यात, त्यांचा तार्किक विकास व्हावा, या उद्देशाने शाळेचे शिक्षक श्री. राजेश कोगदे हा अनोखा उपक्रम राबवत आहेत. जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा, कदमापूर येथे शिकणारे इयत्ता चौथीतील विद्यार्थी एक विलक्षण कौशल्य आत्मसात करत आहेत. संगणकाच्या बायनरी भाषेचा गूढ कोड ते आपल्या बोटांवर मोजत शिकत असून, त्याचा वापर करून कोणताही कोड तयार करणे आता त्यांच्यासाठी अगदी सहजसोपे होत असल्याचे मत शाळेचे मुख्याध्यापक श्रीधर पल्हाडे यांनी व्यक्त केले.

बायनरी कोड(द्विमान पद्धती)ही संगणकाची मूलभूत भाषा असल्याचे विद्यार्थ्यांना शिकविताना त्यांनी ती गणिताशी जोडली. त्यातून बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या क्रिया विद्यार्थ्यांना सहज व आनंददायी पद्धतीने करत आहेत.या उपक्रमामुळे मुलांच्या मनातील गणिताविषयीची भीती दूर झाली. अवघड वाटणार्‍या संकल्पना खेळता-खेळता आत्मसात होऊ लागल्या. बायनरी पद्धतीतून अंकांची मांडणी करताना विद्यार्थ्यांची केवळ गणितीयच नव्हे तर तार्किक व विश्लेषणात्मक विचारसरणी विकसित होत आहे.

ग्रामीण भागातील मुलंही तंत्रज्ञानाच्या शर्यतीत मागे नाहीत

कदमापूरसारख्या ग्रामीण भागातील मुलांना संगणकीय विचार व कोडिंगच्या जगाशी ओळख करून देणारी 

ही पद्धत प्रेरणादायी ठरत आहे. साधनसामग्री

चा अभाव असूनही, शिक्षकाच्या सर्जनशीलतेमुळे विद्यार्थ्यांनी डिजिटल जगाची काळात नवनवीन कौशल्ये आत्मसात करण्याची गरज अधोरेखित होत असताना, कदमापूरच्या शाळेने दाखवून दिले की, योग्य मार्गदर्शन, कल्पकता आणि सकारात्मक दृष्टीकोन असेल तर ग्रामीण भागातील मुलंही तंत्रज्ञानाच्या शर्यतीत मागे नाहीत.

– रविंद्र चेके केंद्रप्रमुख, पळशी बु.

गणित ही केवळ परिक्षेसाठीची संकल्पना न राहता जीवनाचा भाग व्हावी

विद्यार्थ्यांनी शिकलेले ज्ञान दैनंदिन जीवनात वापरले पाहिजे. गणित ही केवळ परिक्षेसाठीची संकल्पना न राहता जीवनाचा भाग व्हावी, यासाठी शिक्षक राजेश कोगदे राबवित असलेला उपक्रम खूप स्तुत्य आहे.

 

श्रीधर पल्हाडे , मुख्याध्यापक

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें