मलकापूर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पालकमंत्री यांनी केली पाहणी

बुलढाणा न्यूज – नैसर्गिक आपत्तीच्या संकटात सापडेल्या शेतकर्‍यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे आहे. मागील जून ते ऑगस्ट महिन्यातील अवेळी पाऊस आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाई वितरित केली जात आहे. सप्टेंबर महिन्यात गेल्या काही दिवसात झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करुन घ्यावे असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.मकरंद पाटील यांनी आज बुलढाणा तालुक्यातील नळकुंड, मलकापूर तालुक्यातील दाताळा, जांबुळ धाबा येथील शेतकर्‍यांच्या बांधावर जावून पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.

पुढे बोलतांना पालकमंत्री यांनी सांगितले की, नदीजवळील खरडून गेल्या जमिनी व वाहून गेलेल्या शेतीपूरक साहित्य, जनावरे आणि पडझड झालेल्या घरांची नोंद करुन घ्यावी.आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही करण्यात येईल. शेतकर्‍यांनी खचून जाऊ नये, शेतकर्‍यांच्या पाठीशी आम्ही आहोत, असे आश्वस्त करत पालकमंत्री ना. पाटील यांनी शेतकर्‍यांना धीर दिला.

यांची पाहणी दरम्यान होती उपस्थिती
आमदार चैनसुख संचेती, आमदार संजय गायकवाड, आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे, शरद पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे, तहसिलदार, तालुका कृषी अधिकारी, तलाठी आदी अधिकारी व कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें