Buldhana News: जनतेचे प्रश्न, विकासाचे मुद्दे हे काँग्रेसचे लढाईचे शस्त्र :  राहुलभाऊ बोंद्रे

People’s questions, development issues are Congress’ weapon of war: Rahulbhau Bondre

बुलढाणा न्यूज / साधना थोरात

लोकशाहीची हत्या दिवसाढवळ्या  सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतचोरी केली जाते. हे अधर्माचे राजकारण काँग्रेस नेते राहुल गांधींनी उघड केले आहे. गावोगावी जाऊन भाजपच्या खोटेपणाचा पर्दाफाश करा. बूथपातळीवर संघटन मजबूत करा, असे निर्देश जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी काँग्रेस पदाधिकार्‍यांना दिले. जनता हीच खरी मालक आहे, आणि तिला विश्वास देणारे नेतृत्व काँग्रेस जवळच आहे. त्यामुळे प्रत्येक गावात काँग्रेसचा झेंडा फडकला पाहिजे. जनतेचे प्रश्न, विकासाचे मुद्दे आणि कामाची पारदर्शकता हेच आपल्या लढाईचे शस्त्र असणार आहे. सर्व कार्यकर्त्यांनी आता कामाला लागा असे आवाहनही राहुलभाऊ बोंद्रे यांनी केले.

 केवळ निवडणूक नाही तर आता लोकशाहीच्या बचावाची लढाई आहे या घोषवाक्याने संपन्न झालेली ही बैठक जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा संचारुन गेली आहे. संघटन बळकट करण्याचा निर्धार, भाजपविरोधात थेट लढाई आणि काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नेतृत्वावर विश्वास अशा त्रिसुत्रीवर काँग्रेसने आपली रणनिती स्पष्ट केली आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या रणसंग्रामात काँग्रेस पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने उतरतेय, यावेळी मागे हटायचं नाही, काँग्रेसचाच झेंडा फडकवायचा आहे, असा निर्धार काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

 भारतीय जनता पक्ष देशातील लोकशाही व संविधान संपवण्याचे काम करत आहे. निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी केली जात आहे. महाराष्ट्र, हरियाणा, कर्नाटकातील मतचोरी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उघड केली आहे. लोकशाही व संविधान आज धोक्यात असून ते वाचवण्यासाठी राहुल गांधी संघर्ष करत आहेत, ही लढाई मोठी व कठीण आहे. पण आपण सर्वजण राहुलजींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून हा लढा जिंकू.  लोकशाही व संविधानच्या लढाईनेच सत्ताधारी भाजपला नामोहरण करणार, असा ठाम निर्धार जिल्हा प्रभारी राजेंद्र राख यांनी व्यक्त केला.  काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी संघटना तळागाळापर्यंत मजबूत करण्याची गरज असून सर्वांनी एकदिलाने काम करणे गरजेचे आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसच्या झेंडा फडकवा, असे आवाहनही त्यांनी केले.

बुलढाणा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवार २४ सप्टेंबर रोजी  जिल्हा काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणी बैठकीत बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हाध्यक्ष मा.आ.राहुलभाऊ बोंद्रे, आमदार धिरज लिंगाडे, मा.आ. राजेश एकडे,  प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मणराव घुमरे, प्रदेश सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर, रामविजय बुरूंगले,  प्रदेश सचिव डॉ. अरविंद कोलते, प्रदेश नियुक्त विधानसभा प्रभारी डॉ. ऐश्वर्या राठोड,  महेश गणगणे, किसनराव म्हस्के, प्रकाश तायडे, सुरेश गवळी, ज्ञानेश्वर पाटील, कासमभाई गवळी, मंगलाताई पाटील, बाळाभाउ भोंडे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ब्लॉक निहाय आढावा

सर्वप्रथम नवनियुक्त विधानसभा प्रभारींचे सत्कार करून ब्लॉक निहाय आढावा घेण्यात आला. तसेच २७ सप्टेंबरला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा. खा. मुकुलजी वासनिक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. तसेच जिल्हा सरचिटणीस सतिष मेहेंद्रे यांनी जिल्हा काँग्रेसचा आर्थिक हिशोब सादर केला.

याप्रसंगी सरचिटणीस सतिष मेहेंद्रे, तुळशीराम नाईक, अ‍ॅड. अनंतराव वानखेडे, देवानंद पवार,  शैलेश खेडकर, अ‍ॅड मोहतेश्याम रजा, प्रा. गजानन खरात,  प्रकाश धुमाळ, शैलेश सावजी, संभाजी शिर्के, विलास चनखोरे, निलेश काळे, विजयसिंह राजपूत, गणेशराव पाटील,  पदमराव पाटील,  अविनाश उमरकर, शैलेश बावस्कर,  गौतम बेगानी, कल्पना पाटील,  प्रिती भगत,  रंजना चव्हाण,  सुरेश वानखडे,  डॉ. पुरूषोत्तम देवकर,  समाधान काळे, रामभाउ जाधव, अतिष कासारे, डॉ. सतेंद्र भुसारी, दिपक रिंढे, शेषराव सावळे, रईस जमदार,  अ‍ॅड जावेद कुरेशी, पंकज हजारी, प्रदिप देशमुख,  सुनिल तायडे, दत्ता काकस, संजय पांढरे, विष्णुपंत पळसकर, समाधान सुपेकर,  राजेश पोलाखरे, निलेश पाउलझगरे, पुरूषोत्तम झाल्टे, प्रभाकर इंगळे, दिलीप बोरे, भुषण काळे, दिलीप राजपूत, आदींसह मोठ्या संख्येने  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संचलन जिल्हा सरचिटणीस सतिष मेहेंद्रे यांनी तर आभार प्रा. गजानन खरात यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें