LRT College’s NCC Cadets achieve brilliant performance, winning ten medals
अकोला / प्रतिनिधी
११ महाराष्ट्र एन.सी.सी.बटालियन अकोला येथे सोमवार, दि.१५ ते २४ सप्टेंबर २०२५ पर्यंत सी.ए.टी.सी. ११३ कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते. बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल व्ही. एम. शुक्ला यांच्या नेतृत्वामध्ये या कॅम्पमध्ये ११ महाराष्ट्र बटालियन मध्ये मोडणार्या १२ शाळा व १० कॉलेजचे एकूण ४४३ एन.सी.सी. कॅडेट्सनी सहभाग घेतला होता. दहा दिवस चाललेल्या या कॅम्प दरम्यान कॅडेटला नेतृत्व, अब्स्टकल, फायरिंग, ड्रिल तसेच त्यांच्या कलागुणांना चालना विविध प्रकारच्या जबाबदार्या कॅडेट्सला देण्यात आल्या. तसेच वेगवेगळ्या स्पर्धाचे आयोजन सुद्धा या ठिकाणी करण्यात आले.
यामध्ये श्रीमती एल.आर.टी. वाणिज्य महाविद्यालय, अकोला येथील एन.सी.सी. यूनिटच्या एकूण ३१ कॅडेट्सनी प्रत्येक उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन अनेक स्पर्धेमध्ये उत्तमरित्या प्रदर्शन करून दहा मेडल प्राप्त केले. या कॅम्पमध्ये कॅडेट सुरज ठोसर, कॅडेट आयुष कुलकर्णी, कॅडेट प्रथमेश वसतकार, कॅडेट वैभव डाखोळे, कॅडेट ओम चोपडे, कॅडेट कृष्णा ठाकूर, कॅडेट सत्यम टोंगले, कॅडेट विधान तिवारी, कॅडेट धनराज जाहिर, कॅडेट शिवम वाघ, कॉर्पोरल तन्वी मालगन, कॅडेट आरती कोंडेकर, कॅडेट मानसी दळवी, कॉर्पोरल पल्लवी शिरसाट, कॅडेट जानवी पारसकर, कॅडेट तृष्णा सिंह, कॅडेट प्रांजल लांडगे, कॅडेट तृप्ती कोरडे, कॅडेट ऐश्वर्या खंडागळे, कॅडेट प्राजक्ता मोगरे, कॅडेट अनुजा देशपांडे इत्यादी कॅडेट्सने सहभाग घेतला होता.
यामध्ये कॉरपोरल निखिल सभादिंगे याला कंपनी सीनियर मध्ये गोल्ड मेडल, कॉरपोरल आदित्य टाले बटालियन सीनियर मध्ये गोल्ड मेडल, कॅडेट वैभव काळपांडे याला मेस कमांडर मध्ये गोल्ड मेडल, लान्स कार्पोरल निखिल मोरया याला मेस कमांडर मध्ये गोल्ड मेडल, कॅडेट ओम काळे याला निबंध स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल, कॅडेट जय तायडे याला ड्रिल कॉम्पिटिशन मध्ये सिल्वर मेडल, कॅडेट वेदांत वैराळे याला गार्ड ऑफ ऑनर मध्ये सिल्वर मेडल, कॅडेट क्षितिजा जामदार हिला डिबेट कॉम्पिटिशन मध्ये गोल्ड मेडल, कॅडेट प्रेरणा गोतमारे हिला गार्ड ऑफ ऑनर मध्ये सिल्वर मेडल, लान्स कार्पोरल दिव्या बावस्कर हिला गार्ड ऑफ ऑनर मध्ये सिल्वर मेडल प्राप्त केले. या कॅडेट्सला कॅम्प कमांडर यांच्या हस्ते मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मानीत केले गेले.
श्रीमती एल.आर.टि. महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ.जी.जी. गोंडाणे, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. योगेश अग्रवाल, व्यवस्थापन अभ्यासक्रम समन्वयक डॉ. वर्षा सुखदेवे व एन.सी.सी. अधिकारी कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांनी कॅडेट्सनी मिळवलेल्या यशाबद्दल तसेच महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर पाडल्याबद्दल त्यांचे कौतुक करून त्यांचा सत्कार केला. कॅडेटच्या या कामगिरी बद्दल दि. बी.जी.ई. सोसायटीचे अध्यक्ष अॅड. मोतीसिंहजी मोहता, मानद सचिव डॉ. पवनजी माहेश्वरी, वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमारजी तोष्णीवाल, कनिष्ठ उपाध्यक्ष इंजि. अभिजीतजी परांजपे, सह-सचिव सी.ए. विक्रमजी गोलेच्छा यांच्यासह कार्यकारी सदस्यांनीही कॅडेट्सचे अभिनंदन करून त्यांचे कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.