Thief’s attempt to break into the strong room at Buldhana Urban Attali branch fails
अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
गिरीष पळसोदकर/ खामगाव
बुलढाणा अर्बनच्या अटाळी शाखेतील स्ट्राँग रूम फोडण्यात अज्ञात चोरटा अपयशी ठरल्याने त्याला रिकामे हाताने परतावे लागले. चोरीची ही घटना लक्षात आल्यानंतर शाखेतील कर्मचार्यांमध्ये एकच खळबळ माजली होती.
या घटनेबाबत प्राप्त माहिती अशी की,तालुक्यातील अटाळी येथे एकनाथ टाले यांच्या मालकीच्या जागेत बुलढाणा अर्बनची अटाळी शाखा आहे. या शाखेचे समोरील शटर चोरट्याने कुलूप तोडून आत प्रवेश करत स्ट्राँग रूम फोडण्याचा प्रयत्न केला. ..पण ते स्ट्राँग रूम फोडण्यास त्या चोट्याला यश आले नाही. त्यामुळे या स्ट्राँग रूममधे ठेवलेली १५ ते २० लाखाची रक्कम वाचली. स्ट्राँग रूम ग्राहकांनी गहाण ठेवलेली सोन्याची पाकिटे होती असे समजते. ती पाकिटे पण चोरट्याच्या हाती पडली नाही. चोरीचाी प्रयत्न फसल्याची ही घटना सोमवार, २२ सप्टेंबरच्या रात्रीच घडली. २३ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास एकनाथ टाले यांना शाखेचे शटरचे कुलूप तुटलेले दिसले आणि वायर कापलेल्या दिसून आले.
त्यामुळे त्यांनी बुलढाणा अर्बनचे आर.ए.शर्मा R.A. Sharma of Buldhana Urban यांना याबाबतची माहिती दिली. त्यांनी शाखेच्या समोर येऊन पाहिले असता त्यांना शटरचे कुलूप गायब झालेले आणि वायर कापलेल्या दिसून आल्यात. शर्मा यांनी याबाबतची माहिती बुलढाणा अर्बनचे वरिष्ठ अधिकारी, विभागीय व्यवस्थापक प्रकाश सावळे व शाखाधिकारी रामेश्वर दांडगे यांना ही माहिती दिली. ही माहिती मिळताच शाखाधिकारी, विभागीय व्यवस्थापक शाखेसमोर दाखल झाले. या घटनेची माहिती खामगाव ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर त्यांच्या समक्ष शाखाधिकारी दांडगे व कर्मचारी यांनी शाखेत प्रवेश करून पाहणी केली असता त्यांना सीसीटीव्ही व सायरनच्या वायर कापलेल्या दिसून आल्या आणि स्ट्राँग रूम फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले. एवढेच नव्हे तर चोरट्याने शाखेच्या काऊंटरचे ड्रावर उघडून त्यात काही मिळते का? याचा प्रयत्न केला मात्र त्यातही त्याला काही मिळाले नाही. शाखेतील संगणकाची तोडफोड त्या चोरट्याने केली आणि सीसीटीव्ही कॅमेराचा डीवीआर चोरीस गेल्याचे दिसून आले.
श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण
अज्ञात चोरट्याचा सुगावा लागावा याकरिता खामगाव ग्रामीण पोलिसांनी बुलढाणा येथून श्वान पथक व तज्ञांना पाचारण केले होते. मात्र श्वान चोरट्याचा मार्ग दाखविण्यास अपयशी ठरले. ठसे तज्ञांना काही ठसे मिळाले असल्याची माहिती मिळाली आहे. चोरीचा प्रयत्न झाल्याची तक्रार बुलडाणा अर्बन अटाळीचे शाखाधिकारी रामेश्वर दांडगे यांनी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दि.२३ सप्टेंबर रोजी दिली. यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलीस करीत आहे.