Government sorghum procurement extended… but who will the farmer king praise?
खासदार प्रतापराव जाधव की आमदार चैनसुख संचेती यांना..?
MP Prataprao Jadhav or MLA Chainsukh Sancheti..?
बुलढाणा न्यूज
साधना थोरात
राज्य सरकारने ज्वारी खरेदीला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भात केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी दि.१६ सप्टेंबर २०२५ रोजी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची मुंबई येथे भेट घेऊन बंद पडलेली ज्वारी खरेदी सुरू करावी व ज्वारी खरेदीला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली होती. तर शासकीय ज्वारी खरेदीस मुदतवाढ व उद्दीष्ट वाढवून देण्याची मागणी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार चैनसुख संचेती BJP State Vice President and MLA Chainsukh Sancheti यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Chief Minister Devendra Fadnavis यांच्याकडे केली होती.
आमदार चैनसुख संचेती यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, शासकीय ज्वारी खरेदीची मुदत ३१ जुलै होती. परंतु बुलडाणा जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन जास्त झाल्यामुळे तसेच मलकापूर मतदारसंघात शेतकर्यांचा ज्वारीचा पेरा जास्त असल्यामुळे उत्पादनात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. खरेदीची मुदत संपल्या मुळे बर्याच शेतकर्यांचा माल घरातच पडून आहे. तसेच खासगी बाजारपेठेत ज्वारीचे भाव कमी असल्यामुळे शेतकर्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शासकीय ज्वारी खरेदीस मुदतवाढ देवून ज्वारी खरेदीचे उद्दीष्ट वाढवून देण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे २ ऑगस्ट रोजी केली होती. यावर मुख्यमंत्री यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांनी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर राज्य शासनाने याबाबत रब्बी पणन हंगाम २०२४- २०२५ करीता शासकीय ज्वारी खरेदीची मुदतवाढ मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवून दिली आहे. याबाबतचे आदेश शासनाच्या उपसचिव राजश्री सारंग यांनी निर्गमित केले आहेत.
तर शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव Shiv Sena Shinde faction MP Prataprao Jadhav यांच्या कार्यालयाकडून आलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमूद आहे की, यावर्षी राज्यात ज्वारी लागवडमध्ये वाढ झाल्यामुळे उत्पादनातही वाढ झाली आहे. खुल्या बाजारामध्ये ज्वारीचे दर कमी असल्यामुळे शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. पश्चिम विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्वारीची लागवड मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. जिल्ह्यातील शेगाव, खामगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद व इतरही भागात शेतकर्यांनी हमीभाव ज्वारी खरेदी करिता नोंदणी केली आहे. परंतु दरम्यानच्या काळात शासकीय हमीभाव खरेदी केंद्र बंद पडल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांनी केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे ज्वारी खरेदी केंद्र सुरू करावे व मुदत वाढ द्यावी, अशी मागणी केली होती.
सरकारचा हमीभाव जास्त आहे पण खरेदी केंद्र बंद पडल्यामुळे शेतकर्यांना ही ज्वारी खुल्या बाजारात कमी दराने विकावी लागत आहे. शेतकर्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी बंद पडलेले खरेदी केंद्र पुन्हा सुरू करून ज्वारी खरेदीला मुदतवाढ द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. हा झाला ज्वारीच्या खरेदीच्या मुदतवाढीचा मुद्दा तर दुसरीकडे नुकत्याच झालेल्या शिवसेना शिंदे गटाकडून आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार, २० सप्टेंबर रोजी आगामी निवडणूक व दसरा मेळाव्याची नियोजन बैठक पार पडली. यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना सांगितले की, आम्ही भाजपशी युतीसाठी सकारात्मकच आहोत. मात्र संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात ज्या पद्धतीने युती होईल त्याच पद्धतीने बुलडाणा मतदार संघातही भाजपशी युती झाली पाहिजे. या पॅटर्न प्रमाणे युती झाली तरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये प्रामाणिकपणे काम होईल, असे मत शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख तथा आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केले. या सर्व राजकीय घडामोडीवरुन असे दिसून येते की, बुलढाणा जिल्हयातील नेत्यांमध्ये अद्याप तरी समन्वय दिसून येत नाही आहे. त्यामुळे येणार्या काळात युतीसाठी सकारात्मकता कोण दाखवते ते हे येणार काळ ठरवेलच परंतु सद्याची बुलढाणा जिल्हयातील परीस्थिती पहाता जुलै, ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा सोयाबिन पिकाला फटका बसला आहे, यामुळे जिल्हयातील बहूतांश शेतकर्यांना गारद केले आहे. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा सोयाबिनलाच बसला आहे. यामुळे येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणूकांमध्ये शेतकरी राजा कौतुकाची थाप कोणाला देणार हे येणारा काळच ठरवेल एवढे मात्र निश्चित.