शरद देशपांडे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर

एक लाख रोख व स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप

साधना थोरात
मलकापूर : लीलाधर भोजराज चांडक विद्यालयातील जेष्ठ शिक्षक शरद दिगांबर देशपांडे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत हा पुरस्कार देण्यात येणार आहे. एक लाख रोख बक्षीस, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

हा पुरस्कार येत्या २२ सप्टेंबर रोजी मुंबई येथे आयोजित समारंभात प्रदान करण्यात येणार आहे. शरद देशपांडे यांनी अध्यापनासोबतच साहित्य क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले आहे. मृदगंधाचे चांदणे, रानगंध, भावांनाकुर हे त्यांचे कवितासंग्रह तर माझा लेखन प्रवास हा लेखसंग्रह आणि काळोख्यातील काजवा हे कथा संग्रह प्रकाशित झाले आहेत. यापूर्वी त्यांच्या नवोपक्रमास जिल्ह्यातील माध्यमिक विभागातून पहिला क्रमांक मिळाला. त्यांनी मराठी व्याकरणाचे अनेक शैक्षणिक व्हिडिओ तयार करून युट्युब व शासनाच्या दिक्षा अ‍ॅपवर उपलब्ध केले आहेत. त्यांना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, माध्यमिक शिक्षण विभाग व गट शिक्ष णाधिकार्‍यांनी मार्गदर्शन केले आहे. यापूर्वी संस्थेचे माजी प्राचार्य व सध्याचे अध्यक्ष भाऊसाहेब डोरले आणि संस्थेचे माजी अध्यक्ष स्व.भाऊसाहेब मेरेकर यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें