खामगाव जवळ होणार जखमी वन्य प्राण्यांवर उपचार ते शस्त्रक्रियेची सुविधा

Treatment and surgical facilities for injured wild animals will be set up near Khamgaon

वन्य प्राण्यांवर होणार उपचार
बिबट्या,वाघ,कोल्हा,लांडगा, तडस,हरीण,काळवीट,चितळ, निलगाय, चिंकारा,सांबार,तिबेटी, काळवीट,चार शिंगे असलेला मृग्र, बोनेट, हिरस, चिंपाकशी, लंगूर,घार, घुबड,गिधाड, व इतर उडणाऱ्या पक्षांवर उपचार करण्यात येतील या उपचार केंद्रातील पिंजऱ्याला जोडूनच प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासा अधिवासासाठी पिंजरे राहणार आहेत.संपूर्ण उपचार केंद्र हे बंदिस्त स्वरूपाचे राहणार आहे. प्राण्यांच्या विरंगुळ्या करिता तळे, खोपडी,केलेल्या लाकडी फांद्या स्केचिंग साठी झाडांच्या शाखा इत्यादी ठेवण्यात येणार आहे.संपूर्ण उपचार केंद्रात अग्निशमन ची व्यवस्था राहणार आहे अशा प्रकारचे हे सुसज्य उपचार केंद्र राहणार आहे.

 

बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यासह इतर जखमी वन्य प्राण्यांना आता नागपूर किंवा पुणे येथे उपचारासाठी घेण्याची गरज पडणार नाही. आता या जखमींवर खामगाव पासून जवळच असलेल्या जनुना ते किन्ही महादेव मार्गावर दहा कोटी 25 लाख रुपये खर्च करून सुसज्ज उपचार केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या सेंटरसाठी लागणाऱ्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी डॉक्टरांसह कर्मचारी व अन्य सुविधा लवकरच सरकार तर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे सेंटर कार्यान्वित झाल्यानंतर जखमी वन्य प्राण्यांवर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे. सध्या नागपूर व पुणे या दोन ठिकाणीच अशा प्रकारचे उपचार केंद्र कार्यान्वित आहे.आता जिल्ह्यातील खामगाव पासून जवळच असलेल्या जनुना किन्ही महादेव रोडवर हे केंद्र लवकरच सुरू होणार असल्याने याचा फायदा बुलढाणा जिल्ह्यासह अकोला वाशिम अमरावती व यवतमाळ या जिल्ह्यातील जखमी वन्य प्राण्यांच्या उपचारासाठी होणार आहे.

उपचार केंद्रातील सुविधा

या उपचार केंद्रात 20 पिंजरे राहणार आहेत. ऑपरेशन थेटर, एक्स-रे,ची सुविधा आयसीयू, इंडोअर सुविधा, शवाविच्छेदन गृह,पशुवैद्यकीय ब्लॉक बर्निंग सेंटर,आधी सुविधा उपलब्ध राहणार आहे.या सुविधेमुळे जखमी वन्य प्राण्यांना इतरत्र कुठे हलविण्याची गरज पडणार नाही. हे केंद्र राज्य सरकारच्या वनविभागातर्फे उभारण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें