बुलढाणा न्यूज- महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये विविध पदावर कार्यरत असलेल्या शासनमान्य शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेच्या वतीने भारतीय सैन्य दलामध्ये लेफ्टनंटपदी निवड झाल्याबद्दल अनिकेत पवार यांचा जिल्हा सैनिक कार्यालय बुलढाणा दि.४ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्कॉडन लीडर श्रीमती रूपाली मानमोडे (सरोदे) मॅडम यांच्या हस्ते व संघटनेचे पदाधिकारी तसेच जलसंपदा विभाग, जलसंधारण विभाग व इतर शासकीय विविध विभागातील कर्मचारी व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
सदर सत्कार समारंभास संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर ठेंग, जिल्हा महिला प्रमुख श्रीमती उज्वला कुलकर्णी (वीर पत्नी), मोताळा तालुका अध्यक्ष श्री अजित कुमार पालवे, श्री गजानन पांगरकर, श्री अशोक डोळस, श्री आर जे जाधव, श्री एस पी पाटील, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री जी व्हि. बढे, श्री अर्जुन गाडेकर, श्री रंजन सरकटे, श्री सपकाळ, श्री संजय सुसर, श्री शरद भारोटे, श्री मंजीतसिंग राजपूत, श्री भास्कर अंभोरे, श्री.लांडे साहेब, श्री. राजकुमार गीते व विविध कार्यालयातील कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.