पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रारी आहेत काय मग या बुधवारी डाक अदालत मध्ये

Are there any complaints about postal services? Then this Wednesday, the postal court will be held.

बुलढाणा न्यूज
पोस्टाच्या कार्याविषयी किंवा कामकाजाबद्दल सहा आठवड्यात तक्रारींचे निवारण झालेले नसल्यास अशा तक्रारींची दखल डाक अदालतीमध्ये घेतल्या जाणार आहे. याकरीता पोस्ट विभागाच्या तक्रारी सोडविण्यासाठी बुलडाणा डाकघर विभागातर्फे बुधवार, दि. १० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आले आहे.

देशातील पोस्टाची सेवा ही सामाजिक आणि आर्थिक जीवनाचा एक अभिन्न भाग आहे. देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये पोस्टाच्या सेवेने वेगळ्या प्रकारचे स्थान निर्माण केले आहे. पोस्ट खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा व ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचा प्रयत्न करते.

 ही सेवा देताना संभाषण, पत्रव्यवहार किंवा सेवेमध्यील काही त्रृटीमुळे पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रारी होतात. तक्रारींचा योग्य प्रकारे न्याय निवडा करण्यासाठी पोस्ट खात्यातर्फे डाक अदालती घेण्यात येते. विशेषत: टपाल, स्पीड पोस्ट, डाक वस्तू पार्सल, बचत बँक आणि मनीऑर्डरबाबत तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. तक्रारीत तारीख आणि ज्या अधिकार्‍यास मुळ तक्रार पाठविली त्याचे नाव आणि हुद्दा आदी संबधित माहिती डाक सेवेबाबत तक्रार डाकघर अधिक्षक गणेश आंभोरे, बुलडाणा विभाग, यांचे नावे दोन प्रतीत सोमवार, दि. ८ सप्टेंबर २०२५ पर्यंत पोहचेल, अशा रीतीने पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें