बुलडाणा/जिमाका
जिल्हा रुग्णालय बुलडाणा येथे प्रत्येक शुक्रवार नियमित पणे नेत्र, मतिमंद, मनोरुग्ण तसेच कान-नाक-घसा संबंधीत दिव्यांग तपासणी बोर्डाचे शिबीर आयोजित केले जाते. मात्र, दि. ५ सप्टेंबर २०२५ (पहिला शुक्रवार) रोजी ईद-ए-मिलाद निमित्त शासकीय सुटी असल्यामुळे यावेळचे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द करण्यात आले आहे.
नागरिकांनी त्या दिवशी रुग्णालयात दिव्यांग तपासणीस येऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नागरिक आले तरी झालेल्या गैरसोयीस जिल्हा प्रशासन जबाबदार राहणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.