शेतरस्ता मोकळा करण्यासाठी दोन वर्षांपासून तिढा कायम

रुईखेड मायंबा शिवारातील गट नंबर २५४ शेतरस्ता मोकळा करण्यासाठी  आमरण उपोषण

बुलढाणा न्यूज

रुईखेड मायबा
बुलढाणा तालुक्यातील रुईखेड मायंबा येथील आठ महिला व दहा पुरुष असे उपोषणाला बसले. त्यांनी अनेक दिवसांपासून मागणी करुन देखील शेतरस्ता मोकळा करण्यात आली नसल्यामुळे त्यांनी येथे बुधवार, दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी उपोषणाला सुरुवात केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्ते असे की,  गट नंबर २५४ मधून जाणारा शेत रस्ता अडविण्यात आल्यामुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे सदरचा  रस्ता मोकळा करून देण्यासाठी महिला शेतकरी व पुरुष यांनी रुईखेड मायंबा शिवारातील गट नंबर २५४ मध्येच आमरण उपोषण सुरू केले आहे. रस्ता वडलोपार्जित बैलगाडीचा पूर्व पश्चिम रस्ता आहे. सदर रस्ता हा गैरअर्जदारांनी संगनमताने कट कारस्थान रुचून  गट नंबर २५४ मधील शेत जमीनचे दक्षिण-उत्तर नाली करून अडविलेला आहे. त्यामुळे आम्ही याबाबत गावातील प्रतिष्ठित व्यक्तीमार्फत अनेक वेळा समजावून सांगून सदर रस्ता  खुला करून देण्याबाबत समजावून सांगण्याचा प्रयत्न देखील केला आहे, परंतु  अर्जदार यांचे प्रयत्न पूर्णपणे निष्पळ ठरले.

२०२३ पासून रस्ता अडवल्यामुळे आमच्या शेतात खते बियाणे व इतर तसेच शेतीचे अवजारे व कास्तकारांना विनंती करून त्यांच्या शेतातून डोक्यावर घेऊन जावे लागते. सदर दावा सद्यस्थितीत न्यायप्रविष्ठ आहे. परंतु सदर दावा हा सन २०२३ पासून न्यायप्रविष्ठ असतानाही व आम्हाला रस्ता खुला करून मिळणे हे अत्यंत जरुरीचे असतानाही तहसीलदार बुलढाणा यांनी आमचा सदरचा रस्ता बाबत अद्याप पावतो कोणतेही आदेश केलेला नाही. त्यामुळे आमची कधीही न भरून येणारे अपरिमित असे नुकसान होत आहे. सदर रस्ता खुला करून मिळण्यासाठी दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी उपोषणाला सुरुवात केली असून लोकशाही मार्गाने उपोषणाला बसलो आहे. या उपोषणाची पूर्वकल्पना तहसीलदार बुलढाणा यांना दिली आहे व एक वेळेस त्यांनी उपोषण स्थळी भेट सुद्धा दिली आहे. या उपोषणकर्त्यामध्ये आठ महिला व दहा पुरुष उपोषणाला बसले आहे व त्यामध्ये दोन महिलांची प्रकृती खालावली असून ते हॉस्पिटलला भरती सुद्धा करण्यात आले आहे.

या उपोषणास अनिता हरी उगले, शिंदू कैलास फेपाळे, कांता महादू वाघ, जिजाबाई मोतीराम वाघ, केसराबाई काशिनाथ तायडे, उषा नारायण उगले, रुख्मन पंढरी तायडे, नर्मदा उत्तम तायडे,  शारदा गजानन तायडे, कैलास त्रंबक पिपाळे, उत्तम तुकाराम तायडे, बाबुराव तुकाराम तायडे, विश्राम काशिनाथ तायडे, विजय काशिनाथ तायडे, पंढरी तुकाराम तायडे, नारायण तुकाराम उगले, हरी नामदेव उगले, मोतीराम ओंकार वाघ, संदीप महादू वाहक, अनिल वसंता वाघ व इतर बसले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें