प्रा.भैयासाहेब पाटील यांना भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

बुलडाणा – विश्व कौशल्य शिक्षण संस्थेचे संस्थापक बुलडाण्याचे भूमिपुत्र भैयासाहेब गोविंदराव पाटील हे गेली विस वर्षापासून यांनी स्थापन केलेल्या विश्व कौशल्य बहूद्देशीय या संस्थेतर्फे आटीआय,स्किल्स डेव्हलपमेंटचे व्दारे गरिब होतकरू विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून त्यांना स्त:च्या पायावर हजारो युवक उभे करून त्यांना उद्देजक बनवीले,दहा हजार कामगारांची मोफत नोंदणी करून इतर लाभ मिळवून दिले.

तसेच समाजातील लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी जिल्हाभर ठीक ठीकाणी आरोग्य शिबिरे घेऊन त्यांना मोफत सेवादीली , आपल्या राजकीय शक्तीचा वापर करून अन्यायग्रस्त अनेक लोकांना, शेतकऱ्यांनान्याय मिळवून दिला असे मोबाईल सारखी सेवादेणारे अन्याय अत्याचाराचा मदतीचा फोन आला की,प्रा.भैयासाहेब पाटील हजर अशा यांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय,धार्मिक कार्याची दखल घेऊन मध्यप्रदेश सरकारने डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळी महू या ठीकाणी 14 एप्रिल ला भिमरत्न पुरस्कार देऊन डॅा.मोहनजी यादव मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जगदिश देवडा हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे अशा समाजसुधारकाची बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथील आंबेडकरी चळवळ मेहकर तथागत ग्रुप , तसेच डॅा. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय सहकारी पतसंस्था मेहकरच्या संयुक्त विद्यमाने 31 ऑगस्ट रोजी डॅा.बाबासाहेब आंबेडकर वाटीका मेहकर येथे आयोजित 103 व्या महाकवी वामनदादा कर्डक जयंती महोत्सव 2025 च्या कार्यक्रमात प्रा.भैयासाहेब पाटील यांच्या कार्याची व कामाची दखल घेऊन.

31 ॲागस्ट रोजी महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंती समारंभ,सत्कार व कलावंत मेळावा डॅा.बाबासाहेब आंबेडकर वाटीका मेहकर याठिकाणी आयोजित केला होता त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते सोपानराव देबाजे,उद्घाटक भिमशक्तीचे कैलास सखदाने, मुख्य मार्गदर्शक नामानंतरवादी पॅंथर प्रा. आर.आर.वानखेडे,ज्येष्ठ विचारवंत प्रा. डि.एस.वाघ, महामानव डॅा.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय पतसंस्थेचे अध्यक्ष विजय खिल्लारे, रिपब्लिकन (आ) एम्पॅाईज असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर विजय मोरे, समाजभूषण गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त सुबोध शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय सपकाळ, आंबेडकरी चळवळीचे सामाजिक कार्यकर्ते एस.बी.गवई, अनिकेत सैनिक स्कूलचे अध्यक्ष अर्जुन गवई, आंबेडकरी युवानेते संघपाल पनाड,हिम्मतराव सरकटे,आशोक दाभाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रा.भैयासाहेब पाटील यांना हा सर्वोच्च महानवाच्या नावाचा भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार,सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करून गौरविण्यात आले.
यावेळी बुलडाणा जिल्ह्यातील समाजीक कार्यकर्ते, आंबेडकरी कवी, गायक, प्रबोधनकार हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें