पर्यावरण मित्र प्रदिप डांगे यशवंत सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेकडून सन्मानित

Environmentalist Pradeep Dange honored by Yashwant Charitable Multipurpose Organization

बुलढाणा न्यूज
बुलढाणा शहरातील यशवंत सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विनोद फकीरा इंगळे यांच्या संकल्पनेतून बुलढाणा शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या व्यक्तिचा सन्मान संस्था दर वर्षी करण्यात येतो. यावर्षी पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या पर्यावरण मित्र प्रदिप डांगे यांचा सत्कार अनिल शेळके, सामाजिक कार्यकर्ते,सुभाष पाटिल, डॉ.अतुल वानेरे, यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन करण्यात आला.

पर्यावरण मित्र प्रदिप डांगे गेल्या ७ ते ८ वर्षापासून पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करत आहे. यामधे प्रामुख्याने पर्यावरण संरक्षण, पर्यावरण संगोपन, पर्यावरण विषई जनजागृतीपर सायकल रॅली, जन्मदिनी वृक्ष लाऊ अंगणी असे अनेक उपक्रम पर्यावरण मित्र मंडळ यांच्या माध्यमातून करत असतात, याचीच दखल घेऊन यशवंत सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेकडून पर्यावरण मित्र प्रदिप डांगे यांचा सत्कार सन्मानपत्र देऊन करण्यात आला.


यावेळी प्रमुख उपस्थितीत प्रा.प्रदिप जाधव, संजय मोरे, गौतम सरकटे, प्रकाश गवई, सागर जाधव, राज सरकटे, जगताप, प्रशिक झिने सह विशेष उपस्थितीत पर्यावरण मित्र निलेश शिंदे, अनु माकोने, प्रा.जीवन जाधव, दिपक पाटील, सार्थक डांगे यांचेसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें