Atmaram Jalte elected as President of Buldhana Photographers Association, Ajay Kalyankar appointed as Secretary
बुलढाणा बुलढाणा फोटोग्राफर असोसिएशनची निवडणूक नुकतीच पार पडली असून या निवडणुकीत आत्माराम झाल्टे यांची निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विठोबा इंगळे व आत्माराम झाल्टे यांनी निवडणूक लढवली.
या निवडणुकीत असोसिएशनच्या ७९सभासदांना मतदानाचा अधिकार होता.त्यापैकी ७४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.मतदानाची टक्केवारी ९२.५० % इतकी होती.बॅलेट पेपर घेण्यात आलेल्या या निवडणुकीत आत्माराम झाल्टे यांनी 43 मते मिळवुन प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा १२ मते जास्त मिळवुन विजय संपादन केला.निवडणूक दि.२६ ऑगष्ट रोजी घेण्यात आली होती. या निवडणुकीमध्ये सदाशिव जतकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून कारभार सांभाळला होता.
निवडून आलेले अध्यक्ष आत्माराम झाल्टे यांनी आपली कार्यकारणी जाहीर केली असून यात अजय कल्याणकर यांची सचिव पदी नियुक्ती करण्यात केली असुन 2025 ते 28 या कालावधीसाठी पुढील सदस्यांची नियुक्ती करण्यात आली उपाध्यक्ष विवेक ढोले, निनाजी भगत, सहसचिव -गजानन सरकटे, तर कार्यकारणीतील सदस्यपदी शेखर श्रीवास्तव, प्रशांत गायकवाड ,निलेश रत्नपारखी, उमेश शिंगणे,नारायण एंडोले ,दीपक पाटील, अमोल इंगळे, विनोद डमाळे यांची निवड करण्यात आली आहे .प्रसिद्धी प्रमुख रविकिरण टाकळकर, विशेष निमंत्रित सदस्य सदाशिव जतकर व डिगांबर जाधव यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारणीतील निवडीबद्दल सर्व सदस्यांचे बुलढाणा शहरातील फोटोग्राफर बांधवांनी अभिनंदन केले आहे. बुलढाणा फोटोग्राफर असोसिएशनच्या माध्यमातून फोटोग्राफर बांधवांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने केल्या जाते हीच परंपरा कायम ठेवत फोटोग्राफर बांधवांच्या हितासाठी सातत्याने काम करत राहीन असे नवनियुक्त अध्यक्ष आत्माराम झाल्टे यांनी सांगितले.