बुलढाणा न्यूज मराठी साहित्य क्षेत्रात आज विपूल प्रमाणत कविता लिहीली जात आहे. जागतीक पातळीवर कवितेने साहित्यात महत्वपूर्ण सांस्कृतिक जबाबदारी केलेली आहे. आज जेव्हा मराठी कवितेचा अवकाश अकॅडेमीक पातळीवर सांगण्यात येतो तेव्हा साधरणतः ज्ञानेश्वरांपासून प्रारंभ सांगण्यात येतो.
परंतु वास्तवतः मराठी साहित्याच्या इतिहासाकडे अधिक चौकसपणे प्रामाणिकतेने अभ्यासक म्हणून पाहिल्यास मराठी कवितेचा प्रारंभकाळ थेरी गाथेेपासुन सुरू होऊन महानुभाव पंथाची महादंबा यांचे धवळे, संत तुकाराम असा मराठी कवितेचा प्रवास झाल्याचे दिसुन येते, असे विचार प्रसिध्द साहित्यिक सुरेश साबळे यांनी बुलढाणा येथील विदर्भ महाविद्यालयात राज्यस्तरीय कवितामहोत्सव समारोप सत्रात प्रमुख पाहुणे साहित्यीक सुरेश साबळे यांनी मांडले. यावेळी सभास्थानी ईश्वर मगर,प्रा.बी.ए.खरात, कॉम्रेड पंजाबराव गायकवाड उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रारंभी आयोजकांचे वतीने प्रा. मुनेश्वर जमईवार, प्रा.डॉ.लक्ष्मण शिराळे, प्रा. डॉ. पि. डी. हुडेकर, प्रा. डॉ. संगिता काळणे पवार मॅडम यांनी शाल, स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. प्राचार्य गोविंद गायकी यांनी प्रारंभी प्रस्ताविक भाषणात दिवसभर कविता महोत्सवाच्या विविध सत्रात झालेल्या प्रत्येक कार्यक्रमाचा सविस्त आढावा घेतला.
प्रा.बी.ए.खरात यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून दिवसभराच्या कार्यक्रमाचा आढावा घेतला आणि हा राज्यस्तरीय कविता महोत्सव यशस्वी झाल्याचे सांगून इंग्रजी कविता सादर करत महोत्सवाचा यशस्वी समारोप केला. कॉम्रेड पंजाबराव गायकवाड यांनी समर्पक भाषण केले. आभार प्रदर्शन प्रा.वैभव वाघमारे यांनी केले.