जखमेश्वर ला पकडण्यात पोलीसांना यश

Jakhamēśvara lā pakaḍaṇyāta pōlīsānnā yaśa

महाराष्ट्रा सह गुजरातमध्ये अनेक गुन्हे दाखल

जखमेश्वर यांचेकडून ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात
पोलीसांनी बळाचा उपयोग करताच जखमेश्वर शिंदे यांच्याकडून दरोडा, रॉबरी, चोरी करताना वापरत असलेले हत्यार, एक सिल्व्हर रंगाचा धारधार पाते असलेला व एका बाजूने खाचे असलेला पाच इंच लांबीचा चाकू, सहा इंच लांबीचा चाकू, एक मुठ असलेली जुनी वापरात असलेली तलवार, एक मोबाईल, मोटारसायकल एम एच २८ ए ए ८०२५ असा एकूण ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

बुलढाणा न्यूज
दरोडा, खून, रॉबरी असे असंख्य गुन्हे दाखल असलेला जखमेश्वर शिंदे (वय ३०) यास पोलीसांनी मंगळवार, दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी अमडापूर ते लव्हाळा दरम्यान पोलीसांनी अथक परिश्रम करुन या अट्टल जखमेश्वर याला अटक केली.
मेहकर तालुक्यातील लोणी लव्हाळा येथील अटल गुन्हेगार असलेला जखमेश्वर शेनफड शिंदे वय ३० वर्ष हा अटल गुन्हेगार असून तो फरार होता. साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत २०१८ मध्ये रोड रॉबरी करुन त्याने ऐवज लंपास केला होता. त्यांच्यावर साखरखेर्डा पोलीस स्टेशन मध्ये कलम ६५/ २०१८ मध्ये ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर किनगाव राजा पोलिस स्टेशन मध्ये २३९/२०२३ आय पी सी ३६५ प्रकरणात तो आरोपी असून अमडापूर पोलिस स्टेशन मध्ये १६८/२०२५ मध्ये बी एन एस ११८(१) , ११५ , ३५१ (२) , ३५२ , गुन्हा दाखल असून फरार होता. तसेच गुजरात राज्यातील वडोदरा येथेही गुन्हे दाखल असून तो फरार होता. आरोपी जखमेश्वर शेनफड शिंदे हा लोणी येथे येत असल्याची गोपनीय माहिती साखरखेर्डा पोलिसांना मिळताच ठाणेदार गजानन करेवाड, लक्ष्मण इनामे, गजानन वाघ , कडूबा डोईफोडे, रामदास वैराळ यांच्यासह अमडापूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार निखिल निर्मळ यांनी पेनसावंगी ते लव्हाळा रोडवर सापळा रचला. पोलीस आपला पाठलाग करीत असल्याचे त्यांनी पाहिले. लगेच त्याने आपली मोटारसायकल एका शेतरस्त्याने वळविली. परंतू चिखल असल्याने मोटारसायकल चिखलात फसली आणि तो खाली पडला. तो उठून पळाला असता साखरखेर्डा आणि अमडापूर पोलिसांनी जखमेश्वर यास पाठलाग करीत पकडले.

गुन्हा दाखल

पोलिस कॉस्टेबल लक्ष्मण शेषराव इनामे यांच्या फिर्यादीवरून आरोपी जखमेश्वर शेनफड शिंदे यांच्या विरुद्ध अप क्रमांक २५७/२०२५ कलम ४/२५ , ७/२५ , शस्त्र अधिनियम सहकलम १३५(१) (३) मुपोका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कडूबा डोईफोडे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें