बुलढाणा- कॅनडा येथे दिनांक १५ ऑगस्ट ते दिनांक २३ ऑगस्ट या कालावधीत पार पडलेल्या युथ वर्ल्ड आर्चरी चॅम्पियन्स स्पर्धेमध्ये भारतीय संघाला सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. जर्मनी सोबत झालेल्या अंतिम सामन्यात अतिशय चुरशीच्या लढाईत भारतीय संघाने टाय शॉर्ट मध्ये डॉट मारून जर्मन संघाचा पराभव केला. भारतीय संघामध्ये बुलढाण्याचा मिहीर नितीन अपार, हरियाणाचा कुशल हलाल व आंध्र प्रदेशाचा गणेश मणिरत्नम यांचा समावेश होता.
मिहीर नितीन अपार ने भारतीय संघाचे नेतृत्व करत भारतीय संघाला सुवर्ण वेध सादत सुवर्णपदकाची कमाई केली. गोल्डन बॉय मिहीरने या अगोदरही भारतीय संघाचे नेतृत्व करत पोलांड येथे भारतीय संघाला सुवर्णपदक व मागील महिन्यात सिंगापूर येथे रजत पदक प्राप्त करून दिले होते. मिहीर अपार मागील बारा वर्षापासून प्रशिक्षक चद्रं कातं इलग याच्ं या मार्गदर्शनात प्रशिक्षण घेत आहे. तो आपल्या यशाचे श्रेय आईवडील व प्रशिक्षकांना देतो. त्याला मिळाल्या यशाबद्दल त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.