चिखली: लोकशाहीर अन्नाभाऊ साठे हे श्रमिक, वंचित आणि शोषित समाजासाठी लढणारे महान समाज सुधारक होते. त्यांच्या साहित्यातून समाजाला दिशा देण्याचं कार्य त्यांनी केले. तर लोकमान्य टिळक हे स्वातंत्र्य संग्रामातील अग्रणी नेते होते. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’, ही टिळकांची गर्जना आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात स्फुरण आणते. दोन्ही महामानवांचे विचार हे आजच्या काळातही तितकेच प्रभावी आणि प्रेरणादायी आहेत. त्यांच्या आदर्शांना अनुसरूनच आम्ही समाजहितासाठी कार्यरत राहू, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांनी केले.
शुक्रवार १ ऑगस्ट रोजी चिखली काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकशाहीर अन्नाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राहुल भाऊ बोंद्रे बोलत होते. प्रारंभी दोन्ही महामानवांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. तद्नंतर मान्यवरांची समायोजित भाषणे झाली.
अभिवादना प्रसंगी बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल भाऊ बोन्द्रे यांच्या सह चिखली शहर पक्षाचे काँग्रेस अध्यक्ष राहुल सवडतकर, माजी अध्यक्ष अथहर काझि, कुणाल बोन्द्रे, प्रा.राजू गवई सर,प्राध्यापक निलेश गावंडे सर, रिकी काकडे, अमीनखा उस्मानखा, राउफ भाई, राजू रज्जाक, गोकुळ शिंगणे विलास कटूले, दीपक थोरात, सचिन शेटे, डॉक्टर संजय घुगे, डॉक्टर अमोल लहाने, आरिफ भाई,कैलास खराडे, भास्कर चांदोरे, मलिक जामदार, गायकवाड, विजय जागृत, प्रकाश सपकाळ, शेख बबलू, रोहन पाटील, नितीन वाघ, अकील खान, सोहिल शेख, सागर साळवे, राहुल चवरे, अमित कोटवे, व्यंकटेश रिंढे, सोनू कोटवे, दिलीप काळे, पत्रकार अनिल कांबळे, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.