Thousands attend the Amritmahotsav Gaurav ceremony of labor leader Hanumant Tate – Divisional Secretary Rajendra Pawar
बुलडाणा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील एकमेव मान्यता प्राप्त संघटना एसटी कामगार संघटनेची कामगार परिषद व स्वर्गीय भाऊ फाटका नंतर ज्या एसटी कामगार संघटनेची धुरा सांभाळली असे एसटी कामगार संघटनेचे वयोवृद्ध नेते एसटी कामगार संघटनेचे राज्य सरचिटणीस हनुमंत ताटे हे वयाचे ७५ वर्ष पूर्ण करत आहे त्या निमित्ताने त्यांच्या जीवनगाथेचा गौरव व्हावा म्हणून त्यांचा अमृतसोहळा तसेच कामगार परिषदचे आयोजन एसटी कामगार संघटनेने आयोजन करण्यात आले आहे.
नेतृत्व जेव्हा समर्पणातुन उठतं ,तेव्हा सन्मान स्वतःहून पुढे येतो एसटी कामगार वर्गाच्या सामूहिक आणि आर्थिक सक्षमीकरण व्हावे अन महाराष्ट्रच्या लोकवाहिनी लालपरीला गतवैभव प्राप्त व्हावे या ध्यासाने पेटून उठलेलं नेतृत्व म्हणजे एसटी कामगार आणि त्या संघटनेचे राज्य सरचिटणीस हनुमंत ताटे २९ जुलै २०२५ रोजी वयाची ७५ वर्ष पूर्ण करत आहे त्या निमित्ताने त्यांच्या जीवणगाथेचा अमृतसोहळा तसेच कामगार परिषदचे आयोजन दि. १ ॲागस्ट २०२५ रोज शुक्रवार सकाळी ठीक १० वाजता विठ्ठलराव तुपे नाट्यगृह हडपसर पूणे ह्या ठिकाणी कामगार संघटने परिषद व गौरव सोहळा आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष एसटी कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष संदिप शिंदे राहणार असून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीयध्यक्ष माननिय अजित दादा पवार यांच्या शुभहस्ते या कामगार परिषद चे उदघाटन होणार आहे.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मध्ये शिवसेना गटाचे मातब्बर नेते उद्योगमंत्री मा.ना. उदयजी सामंत, युवा कल्याण क्रीडा मंत्री मा.ना. दत्तात्रय भरणे, परिवहन राज्यमंत्री माधुरी ताई मिसाळ, जेष्ठ कामगार नेते डॅा. बाबा आढाव, आमदार चेतन तूपे, आ.बापूसाहेब पठारे, आ. योगेश टिळेकर, आ. रविंद्र धंगेकर,हिंद मजदूर सभेचे संजय वढावकर, निवृत्ती धुमाळ, नुसीचे मिलींद कांदळगावकर तसेच तसेच एसटी कामगार संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.
या परिषदेमध्ये एसटी महामंडळ मधील कामगारांचे आर्थिक प्रलंबित विषय सोडविण्यासाठी तसेच एसटीच्या प्रगतीसाठी भरीव शासन निधीची मागणी या परिषदेमध्ये होणार आहे म्हणून या पार्श्वभूमीवर या कामगार परिषदेला महत्व आहे.
या महत्वपूर्ण परिषदेला हजारोंच्या संख्येने एसटी कामगारांनी व हनुमंत ताठे वर प्रेमकरणारांनी उपस्थित राहावे असे आवाहन बुलडाणा जिल्हा एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव राजेंद्र पवार तसेच बुलडाणा विभागातील संघटनेच्या सर्व विभागीय पदाधिकारी, आगार अध्यक्ष/सचिव यांनी केले आहे.