गवळी समाजाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश युवा उपाध्यक्षपदी किन्होळा येथील तुषार गार्वे निवड

Tushar Garve from Kinchola elected as Maharashtra State Youth Vice President of Gawli Samaj

केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र

धामणगांव बढ़े – जालना येथे २० जुलै २०२५ रोजी संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्यातील गवळी समाजाचे सामाजिक अधिवेशन पार पडले. यात अनेक समाजहितासाठी झटणार्‍या युवा तरुणांना समाज सेवा करण्याची संधी देण्यासाठी त्यांची नियुक्ती केली.
या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. तर गवळी समाजाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हिरामण आप्पा गवळी, गवळी समाजाचे महाराष्ट्र युवा प्रदेश अध्यक्ष प्रवीण हुंडीवाले यांच्या नियुक्ती पत्रानुसार व त्यांचे प्रमुख उपस्थितीत किन्होळा येथील तुषार गार्वे यांना केंद्रीय मंत्री मा.श्री.हंसराज अहिर यांचे हस्ते महाराष्ट्र राज्य प्रदेश युवा उपाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देऊन गौरविण्यात आले.

या प्रसंगी महाराष्ट्र राज्यातील अनेक दीग्गज व प्रमुख समाज बांधव कार्यक्रम स्थळी हजर होते. तुषार गार्वे यांच्या नियुक्तीने समाजातील तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यांची महाराष्ट्र राज्य गवळी समाज युवा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांची एकमुखी निवड झाल्याने समाज बांधवासह त्यांचे मित्र परिवाराकडून सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें