२ कोटी ८१ लाख रुपयाचा ठेका असूनही चिखली शहरात दुर्गंधीच ; कराच्या पैशाचा अपव्यय
चिखली शहर काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकार्यांना निवेदन
चिखली : स्वच्छ शहर सुंदर शहर अशी एकेकाळी ओळख असणार्या चिखली शहरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छेतेचे प्रमाण वाढले आहे. सांडपाण्याची विल्हेवाट, घनकचरा व्यवस्थापन, नालेसफाईची कामे होत नसल्याने शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे शहरात घनकचरा व्यवस्थापनाचे काम करण्यासाठी २ कोटी ८१ लाख रुपयाचा ठेका देण्यात आला आहे. एवढा पैसा खर्च होत असतानाही शहरात दुर्गंधीचं आहे. हा नागरिकांच्या कराच्या पैशाचा अपव्यय असल्याचा सवाल चिखलीकरांकडून उपस्थित केला जात आहे. नगर परिषदेने घनकचरा व्यवस्थापन संदर्भात दिलेल्या ठेक्याची सविस्तर माहिती उपलब्ध करुन देण्यासह युध्दपातळीवर चिखली शहरात स्वच्छता अभियान राबवावे, अशी मागणी चिखली शहर काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
सोमवार, २१ जुलै रोजी चिखली नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांना काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद आहे की, चिखली नगर परिषद अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी दिलेले टेंडर व त्या अनुषंगाने करण्यात आलेल्या खर्चाची सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात यावी. यामध्ये घनकचरा व्यवस्थपनासाठी दिलेल्या संपुर्ण ठेक्याची माहिती, ठेका कोणत्या कंपनी/संस्थेला देण्यात आला आहे ? ठेका मंजुरीची तारीख व कालावधी किती आहे ? ठेक्याचे एकुण आर्थीक मुल्य, , ठेका देण्यासाठी काढण्यात आलल्या निविदेची प्रत, निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या इतर कंपनींची माहिती, ठेका अटी व शर्तीची छायाप्रती, सद्यःस्थितीत घनकचरा व्यवस्थापनाचे दररोजचे कामकाज, कचरा गोळा करण्याचे वेळापत्रक, वाहनांची संख्या, कर्मचार्यांची संख्या, ठेकेदारांकडुन करण्यात आलेल्या कामांचे तपशिल व नगर परिषदे मार्फत करण्यात आलेल्या पडताळणी अहवालाची प्रती या माहितीचा समावेश आहे. तसेच शहरातील नाले सफाई व कचरा उचलण्या संदर्भात होणारे जाणीवपूर्वक दुर्लक्ष याअनुषंगाने संबधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी चिखली शहर काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
याप्रसंगी तालुका कॉग्रेसचे अध्यक्ष रामभाऊ जाधव, शहर काँग्रेस अध्यक्ष राहुल सवडतकर, माजी अध्यक्ष अतरोधीन काजी, दीपक देशमाने, डॉक्टर मोहम्मद इसरार, कुणाल बोंद्रे, प्राध्यापक निलेश गावंडे सर, प्राध्यापक राजु गवई सर, सभापती डॉक्टर संतोष वानखेडे, युवक कॉग्रेस अध्यक्ष रिक्की काकडे, श्याम पठाडे, डॉक्टर सत्येंद्र भुसारी, अशोकराव पडघान, किशोर कदम, ज्ञानेश्वर सुरूशे, नगरसेवक राजु रज्जाक, विजय गाडेकर, विलास कंटुले, गोपाल देव्हडे, गोकुळ शिंगणे, बिदुसिंग इंगळे, जय बोंद्रे, शिवराज पाटील, विजय जागृत, डॉ.अमोल लहाने, कैलास खराडे, प्रदिप पचेरवाल, अमिनखॉ उमस्मानखॉ, दिपक थोरात, खलील बागवान, शहीजाद अली खान, डॉ. संजय घुगे, अॅड विलास नन्हई, सचिन शेटे, शेख बबलु, रामेश्वर भुसारी, समद हाजी, प्रमोद रत्नपारखी, रोहण पाटील, विकास लहाने, रामधन मोरे, दत्ता करवंदे, समाधान गिते, नजिर कुरेशी, मनोज जाधव, प्रकाश चव्हाण, कैलास कांडेलकर, गजानन वांजोळ, बाशिद जमदार, भास्कर चांदोरे, शकील भाई, संजय गिरी, शिवा म्हस्के, संजय महाले, आरिफ बागवान, जाकीर शेख, हादी शेख, सादीक जमदार,अकील खान, हाबीब भाई, सोहील शेख, रवि लोखंडे, नितीन वाघ, शेषराव साळवे, प्रदिप साळवे,शेख अजिम, दिनकर जाधव, मनोहर हिवाळे, प्रदिप शेजोळ, भास्कर अण्णा धमक, नंदु आंभोरे, शेषराव आंभोरे, अंबादास वाघमारे, भारत मुलचंदानी, बिबीशन राठोड, गुलाब आंभोरे, परशराम राठोड, सुभाष खरात, कुंदन यंगड, कैलास गायकवाड, दत्तात्रय येवले, सदुनाना ठेंग, विष्णु पाटील, भिमराव हिवरकर, बळीराम इंगळे, नागेश आंभोरे, विष्णु सोळंकी, संजुनाना सोळंकी, समाधान आकाळ, शुभम बुरकुल, लक्ष्मण भिसे, बाळु ढंगारी, प्रथमेश वानखेडे, संदेश वानखेडे, प्रेम वानखेडे, सागर साळवे, व्यंकटेश रिंढे, एन.टी.भुसारी, ज्ञानेश्वर गांवडे, विष्णु गिर्हे, राजीक कुरेशी, संतोष ठेंग, राहुल चवरे, अजिम खान, आशिष थोरात, दत्तात्र साळवे, इरियास शेख, समिर शेख, संजय गुंजकर, भारत गायकवाड, यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.