एकनाथ शिंदे यांनी दलित आणि मराठी मतांच्या गणिताची जुळवाजुळव केली
बुलढाणा न्यूज टिम
येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेना एकनाथ शिंदे यांनी दलित आणि मराठी मतांच्या गणिताची जुळवाजुळव केली आहे. शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेची युतीची घोषणा या दोघा नेत्यांकडून नुकतीच करण्यात आली आहे. हे दोन्ही पक्ष महापालिका आणि झेडपीच्या निवडणुका एकत्र लढणार आहेत. याबाबत आज बुधवारी, १६ जुलै २०२५ रोजी दुपारी एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर या युतीची घोषणा केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार करता शिवसेनेने तयारी सुरू केली आहे. एकनाथ शिंदे यांनी बेरजेचें गणित आखले असून त्यांनी आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेला सोबत घेत त्या माध्यमातून मराठी आणि दलित मतदार सोबत घेण्याची खेळी शिंदेंनी खेळल्याची चर्चा एक दोन दिवसांपासून सुरू होती ती चर्चा अखेर खरी ठरली आहे.
आज बुधवारी १६ जुलै रोजी दुपारी एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर एकत्रित पत्रकार परिषद घेत तशी घोषणा देखील केली आहे.
विधानसभेमध्ये नंबर एकचा पक्ष ठरलेला भाजप हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही एक नंबरवरच राहावा यासाठी नेते आग्रही आहेत. तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबई महापालिका ठाकरेंच्या हातून खेचून घेण्यासाठी भाजपने कंबर कसल्याचे दिसून येत आहे.