भारतीय जनता पार्टी बुलडाणा तालुका कार्यकारिणी जाहीर

बुलडाणा 
सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये संघटनात्मक बदलांचे वारे वाहत असून भाजपा बुलडाणा जिल्हा कार्यालय शिवालय या ठिकाणी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बुलडाणा ग्रामीण भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त तालुका अध्यक्ष सतिश भाकरे पाटील यांनी त्यांची नवी तालुका कार्यकारणी महाराष्ट्र प्रदेश भाजपा व बुलडाणा जिल्हा भाजपाच्या संयुक्त मान्यतेने जाहीर केली.

यामध्ये १ अध्यक्षासह ६ उपाध्यक्ष, २ सरचिटणीस, ६ चिटणीस, १ कोषाध्यक्ष व ४५ मंडळ कार्यकारिणी सदस्य यांचा समावेश आहे. भाजपा बुलडाणा ग्रामीण मंडळ कार्यकारिणी पुढील प्रमाणे अध्यक्ष : सतिश दिनकर भाकरे पाटील.उपाध्यक्ष : सुरेश बाळकृष्ण जाधव, गजानन विनायकराव पाठक, कुलदीप शेनफड पवार, सारंगधर उत्तमराव एकडे, गणेश अशोक जेऊघाले, गणेश बाबुलाल बारवाल. सरचिटणीस : सतिश दिगंबर देहाडराय, प्रवीण अर्जुनराव गाडेकर.चिटणीस : समाधान नामदेवराव जाधव, सुधाकर शामराव वानेरे, मोहन फकीरचंद निमरोट, सोपान दत्तात्रय जगताप, प्रमोद रुद्रप्पा वाघमारे, काशिनाथ शामराव चव्हाण. कोषाध्यक्ष : शरद तेजराव एकडे.

मंडळ कार्यकारिणी सदस्य : सुमंता दासू चव्हाण, सचिन गोविंदा टेकाळे, निंबाजी लोखंडे, विष्णू माधव खराटे, विश्वनाथ दशरथ घोडके, डॉ.अनिल काशिनाथ भालेराव, दत्तात्रय उत्तमराव जेऊघाले, माधवराव मस्के, किशोर गवळी, अमोल सुरेश गायकवाड, प्रशांत वसंतराव बोरसे, शिवाजी पाटील, शिवाजी सारंगधर झुंबड, दिनकर लक्ष्मण मुळे, विलास जगदेव खारडे, गणेश जैन, रवींद्र कुंडलिक जाधव, पंजाबराव सौर, नंदकिशोर श्रीधर सपकाळ, प्रकाश शेळके, सुनील रिंढे, सारंगधर आनंदा सुरोशे, भारत किसन शेजोळ, रामदास उबाळे, कैलास माळी, मनोहर पवार, भगवानराव भोपळे, श्रीकृष्ण खंडागळे, सुनील उबाळे, उमेश जैन, विकास सावळे, विजय हिवाळकर, अमोल जगताप, दिनकर दगडु पाटील, प्रकाश पवार, बबन हैबती पाटील, समाधान वैद्य, बाळासाहेब शंकरराव रूपने, प्रकाश राजगुरे, गणेश काळवाघे, मनोहर पांडुरंग राजगुरे, धीरज बोरसे, रामू पैठने, उषाताई पवार, रंजनाताई पवार सदर कार्यकारणी संघटनात्मक बैठक घेऊन घोषित करण्यात आली.

याप्रसंगी प्रमुख नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे नियुक्ती पत्र जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, तालुकाध्यक्ष सतिश भाकरे पाटील यांच्याहस्ते वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हा सचिव चंद्रकांत बर्दे, अ‍ॅड.सुनील देशमुख, प्रदेश कार्यकारणी सदस्य पंजाबराव नरोटे, विश्राम पवार, अण्णा पवार, बुलडाणा शहर अध्यक्ष मंदार बाहेकर, मोताळा तालुकाध्यक्ष सचिन शेळके, धामणगाव मंडळ अध्यक्ष सागर पवार यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर संघटनात्मक बैठकीचे सूत्रसंचालन अनंता शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन पडोळ सर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें