Lord Kanadje selected for Chandrapriya poem; Kanadje will be honored and felicitated
बुलढाणा न्यूज
बुलडाणा जिल्ह्याला इतिहास,संस्कृती आणि निसर्ग सौंदर्याचा असा काही मिलाफ इथे अध्यात्म, नैसर्गिक सौंदर्य, आणि सांस्कृतिक वारशाचा संगम असलेल्या विविध पर्यटनस्थळांसाठी ओळखला जातो.बुलडाणा शहरातील येथील कवी उत्कृष्ट चारोळी व गझलकार भगवान कानडजे पाटील यांची २० जुलै पुणे येथे होणार्या राज्यस्तरीय कवी संमेलनासाठी चंद्रप्रिया या कवितेची निवड करण्यात आली आहे.
चिखली तालुक्यातील डोंगरशेवली सारख्या ग्रामीण भागातून आलेल्या भगवान कानडजे यांनी बुलडाणा येथे खासगी नोकरी करत असताना चारोळी आणि कविता लिहिण्याचा छंद जोपासला आहे. बुलडाणा येथे वास्तव्यास असलेले कवी उत्कृष्ट चारोळी व गझलकार भगवान कानडजे यांना पुणे येथील आयोजित गुरुपौर्णिमेनिमित्त ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक चंद्रकांतदादा वानखेडे यांच्या पाद्यपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने २० जुलै २०२५ रोजी चारोळी मंच पुणे व चारोळी मंच नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य फार्म वडगाव मावळ येथे राज्यस्तरीय कवी संमेलन आयोजित केले आहे.
गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रातून बरेच कवी व कवयित्री या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवणार आहेत. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक चंद्रकांत दादा वानखेडे यांचे अध्यक्षतेखाली व कवयित्री प्रिया माळी स्नेहबंध प्रकाशन नाशिक येथील स्नेहल चौधरी,विनोद सावंत, दिनेश माडोकार, रवींद्र आचार्य, नागपूर येथील प्रसिद्ध निवेदक कवी हितेश गोमासे,गझलकार विजय वासाडे यांच्या उपस्थितीत दोन सत्रामध्ये कवी संमेलन पार पडणार आहे.विशेष सहकार्य व कार्यक्रमाचे आयोजक विनायक चिखलीकर पुणे व तुकाराम कांबळे नांदेड यांनी केले आहे,भगवान कानडजे हे “चंद्रप्रिया” ही कविता सादर करणार असून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. बुलडाणा येथील मित्र परिवार व साहित्यिक यांनी आनंद व्यक्त केला आहे.