बुलढाणा टिम
अखिल भारतीय काँग्रेस आदिवासी विभागाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राज्याचे माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंतराव पुरके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले असुन आदिवासी समाजाच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडून त्यांना आता न्याय मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव के. सी. वेणुगोपाल यांनी अखिल भारतीय काँग्रेस आदिवासी विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी राज्याचे माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंतराव पुरके यांची नियुक्ती केली आहे. प्रा.पुरके हे राज्यातील संवेदनशील विचारवंत आणि आदिवासी समाजाच्या न्याय, हक्कासाठी सातत्याने लढणारे लढवय्ये नेतृत्व आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे आदिवासी समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडून समाजबांधवांना न्याय मिळणार असल्याची भावना काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह आदिवासी समाजबांधवांकडून व्यक्त होत आहे.