एका पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षाच्या विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

बुलढाणा न्यूज टिम
नांदुरा – एका पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षाच्या विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना दिनांक १ मे २०२५ ते ३ जुलै २०२५ दरम्यान घडली. फिर्यादी महिला यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली.त्यानुसार आरोपी अजमतबेग उर्फ बाबामिर्झा अकबर बेग मिर्झा ( वय ३७ )राहणार वडनेर भोलजी हा आपण समाज सेवेचे कार्य करायला जात असताना खुल्या पद्धतीने आपला पाठलाग करीत आहे. तसेच यावेळी फिर्यादीस लाज वाटेल अशाप्रकारचे इशारे व हातवारे करतो.तसेच आपण सोबत काम करू असे म्हणून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.

तसेच तू माझ्या बरोबर काम करीत नसल्यास तुझी वृत्तपत्रात बदनामी होईल असा मजकूर प्रकाशित करीत आहे. अशा फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता ७८(२),७९,३५२(२)(३),३५१(२)(३) कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास प्रमोद चिखलकर करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें