देशमुखांच्या गढीवर १ जुलै रोजी करण्यात आले सन्मानित
बुलढाणा न्यूज टिम
बुलढाणा – सामाजिक कार्यकर्ते सुनील सपकाळ यांना तरुणाई फाऊंडेशनच्या वतीने घोषित करण्यात आलेल्या कार्यगौरव पुरस्काराचे वितरण जिजाऊंचे तेरावे वंशज शिवाजीराजे जाधव, पत्रकार गणेश निकम, कैलास राऊत यांच्या हस्ते मंगळवार, दि.१ जुलै २०२५ रोजी देशमुख गढी हतेडी येथे सन्मानित करण्यात आले.
लोक भूमिका घेत नाही. कोणतीही असो डावी की उजवी… या बाजूने की त्या बाजूने, पण भूमिका घेतली पाहिजे. भूमिका न घेणारे लोक घातक ठरले आहे. सुनील सपकाळ यांनी सामाजिक भूमिका घेत दीर्घकाळ कार्य केले. निस्वार्थ भावनेने समाजसेवा करणार्या कार्यकर्त्यांची संख्या मुळातच कमी आहे. जे आहेत त्यांना जपणे आपली सामाजिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन उबाठा शिवसेना गटाच्या राज्य प्रवक्त्या अॅड.जयश्रीताई शेळके यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी राजे जाधव होते. तर उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, भाऊसाहेब शेळके, जिल्हा बँकेचे सीईओ डॉ.अशोकराव खरात, डॉ.अरविंद कोलते,प्रा.डी.एस.लहाने सर, मुक्तारसिंग राजपूत, बाबासाहेब भोंडे, पी.डी.सपकाळ, सदानंद देशमुख, कर्नल जतकर, डॉ.शोन चिंचोले, माजी सभापती दिलीपराव जाधव , अॅड.जयसिंगराजे, डॉ.गजानन पडघान, डॉ.विकास बाहेकर, अनंत शिरसाट, साहित्यिक सुरेश साबळे, शाहिनाताई पठाण, नंदिनी टरपे, प्रज्ञाताई लांजेवार, पत्रकार संदीप वानखेडे, गणेश उबरहंडे, अमोल रिंढे, सुजित देशमुख, अनिल गाढे, विजय घ्याळ, मोहम्मद सोफियान आदी उपस्थित होते.
बुलढाणा जिल्ह्यात विशेष सामाजिक कार्य करणार्या व्यक्तींना जिल्हा भूषण व कार्य भूषण पुरस्कार तरुणाई फाउंडेशन देऊळगाव महीच्या वतीने दरवर्षी देण्यात येतो. २०२५या वर्षाकरिता सुनील सपकाळ सर यांची निवड करण्यात आली होती. सुनील सपकाळ यांनी गेल्या तीन दशकापासून सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे. राजकारणामध्ये सक्रिय असले तरी त्यांचा खरा पिंड हा सामाजिकतेचा राहिला असल्याचे प्रास्ताविकामध्ये अॅड.जयसिंगराजे देशमुख यांनी सांगितले.
यावेळी डॉ.कोलते, जालिंदरभाऊ बुधवत आदींनी विचार व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना सुनील सपकाळ यांनी कार्य गौरव मिळाल्याबद्दल आभार व्यक्त केले. चांगल्या गोष्टीच्या पाठीशी उभे राहणे, चांगल्या विचारांना बळ देणे हे विचार बुलढाणा जिल्ह्यात आणि शहरांमध्ये आजही तेवत असल्याचे ते म्हणाले.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कार्य गौरव पुरस्काराचे थाटात वितरण करण्यात आले. यावेळी शहरातून विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी आवर्जून उपस्थित झाली होती. सुत्रसंचलन पत्रकार राजेंद्र काळे यांनी तर आभार प्रदर्शन गणेशसिंग राजपूत यांनी केले.