मोताळा तहसीलदारांना मोताळा तालुकाध्यक्ष प्रवीण कदम यांच्या नेतृत्वात निवेदन
बुलढाणा न्यूज टिम
भाजपाचे सरकार शेतकरीविरोधी
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तो उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूत राबराब राबतो. कधी कुणाकडे काहीही मागत नाही. परंतु, भाजपातील बबनराव लोणीकरांसारखे काही आमदार शेतकर्यांविरुध्द बेताल वक्तव्य करुन भाजपा सरकारला खुश करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. अशा शेतकर्यांचा अपमान करणार्या लोणीकरांवर कठोर कारवाई व्हायलाच पाहिजे, अशी मागणी तालुकाध्यक्ष प्रवीण कदम यांनी केली.
मोताळाः भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी एका कार्यक्रमात शेतकर्याविरोधात अपमानास्पद व असभ्य वक्तव्य करुन शेतकर्यांचा अपमान केला. लोणीकरांच्या बेताल वक्तव्याचा मोताळा तालुका काँग्रेसने चांगलाच समाचार घेतला. सोमवार, ३० जून २०२५ रोजी लोणीकरांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करुन निषेध नोंदविण्यात आला. काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रवीण कदम यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन देवून लोणीकरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी बुधवार, दि.२५ जून २०२५ रोजी जालना जिल्ह्यातील परतुर येथे आयोजीत एका कार्यक्रमात शेतकरी यांच्याविरोधीत अपमानास्पद आणि बेताल वक्तव्य केले. त्यांनी शेतकर्यांबद्दल एकेरी भाषा वापरत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला पेरणीसाठी ६ हजार रुपये दिले. तरी आमच्यावरच तंगडयावर करतोस, हे विधान केवळ तेथील शेतकर्यांच्याच नाहीतर संपूर्ण शेतकरी समाजाचा अपमान करणारे आहे. या वक्तव्याचा निषेधार्थ सोमवार, दि.३० जून २०२५ मोताळा तालुका काँग्रेसच्या वतीने तहसिल कार्यालयावर धडक दिली.
त्यापूर्वी काँग्रेसने लोणीकरांच्या प्रतिमेला मोताळा येथील चौकात जोडे मारो आंदोलन करुन निषेध नोंदवित लोणीकरांच्या बेताल वक्तव्याची चौकशी करुन त्यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई करण्याची मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रवीण कदम, जिल्हा उपाध्यक्ष तुळशीराम नाईक, माजी तालुकाध्यक्ष गजानन मामलकर, अविनाश मोदे, उत्तमराव वैराळकर, इरफान पठाण आबीत कुरेशी, अभिजीत खाकरे, साहेबराव डोंगरे, विलास पाटील, श्रीकृष्ण खराटे, श्रीकांत कुल्ली, विनोद गायकवाड, राजेश चोपडे, निना इंगळे, शेषराव गायकवाड, भास्कर आघाव, शब्बीर भाई, डॉ. अनिस खाँ. मिलींद अहिरे,विकास उजाडे, दिलीप मोरे, इरफान पठाण, रवी पाटील, कैलास गडाख, चंद्रकांत बोरसे आदींची उपस्थिती होती.