डॉ.गंगाधर पानतावणे म्हणजे आंबेडकरी विचार निर्मिणारी कार्यशाळा- इंजिनियर विजय मोरे

Dr. Gangadhar Pantavane is a workshop that creates Ambedkarite thoughts – Engineer Vijay More
बुलढाणा न्यूज

प्रा.डॉ.गंगाधर पानतावणे म्हणजे परीवर्तनवादी विचारांचे संपादक, समीक्षक, आणि साहित्यिक निर्माण करणारी आंबेडकरी विचारांची कार्यशाळा होते,असे विचार इंजिनियर विजय मोरे यांनी व्यक्त केले.

येथील लोककवी वामनदादा कर्डक बहुउद्देशीय प्रतिष्ठान द्वारा शनिवार, दि.२८ जून २०२५ रोजी बुलढाण्यातील विजयनगर कार्यालयात आयोजित प्रा. डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या जयंतनिमित्ताने अभिवादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष शाहीर डी.आर.इंगळे, सचिव साहित्यिक सुरेश साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कवी रमेश आराख, नाट्यकर्मी शशिकांत इंगळे यांनी डॉ.गंगाधर पानतावणे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादनपर मनोगत व्यक्त केले. तर उपस्थितांनी अभिवादन केले.

कार्यक्रमाला बी.आर.वाकोडे, डी.पी.वानखेडे, कवी, निवेदक तथा नाट्यकर्मी शशिकांत इंगळे, दामोदर साळवे, उत्तम जाधव, मनोहर सरकटे, पी.आर.इंगळे, कवी रमेश आराख, मनोहर कासारे, मिलिंद झिने, विजय गवई, आशाताई वाकोडे, केशरबाई इंगळे वासाडीकर, बाळासाहेब भालेराव इत्यादीसह महिला व पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.

लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानच्या द्वारा आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर मार्गदर्शन करतांना सचिव तथा साहित्यिक सुरेश साबळे यांनी डॉ. गंगाधर पानतावणे यांचे जीवनचरित्र तथा बुलढाण्याशी असलेले संबंध यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाहीर डी. आर. इंगळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें