शेतकर्‍यांनी फळबाग लागवड करुन अंतर पिके घेऊन उत्पन्नाचे स्त्रोत बळकट करावे – प्राची गालफाडे, जलसंधारण अधिकारी

युथ वेल्फेअर असोसिएशन ऑफ इंडीया, बुलढाणाचा  उपक्रम

बुलढाणा न्यूज
रायपूर

बुलढाणा जिल्हयातील मौजे रायपूर येथील संतोष राजपूत यांच्या शेतामध्ये मौजे पळसखेडभट येथील जलसाठयातील गाळ टाकण्यात आला आहे. त्यावर आंब्यांच्या रोपांची फळबाग लागवड करण्यात आली असून पर्यावरण संतूलन राखण्यासाठी व शेतकर्‍यांनी शासकीय योजने अंतर्गत फळबाग लागवड करुन अंतर पिके घेऊन उत्पन्नाचे स्त्रोत बळकट करावे असे प्रतिपादन, जिल्हा जलसंधारण अधिकारी प्राची गालफाडे यांनी केले.

रायपूर- वृक्ष लागवड करतांना जिल्हा जलसंधारण अधिकारी प्राची गालफाडे, जागृती चौधरी, मिताली लांडे,  संस्था संचालक राजेश शेळके, संतोष राजपूत, गजूभाऊ, सौदागर, अमोल व्यवहारे.

 

हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र या अभियानांतर्गत या वर्षी राज्यात १० कोटी वृक्ष लागवड करण्याचा महत्वकांक्षी उद्दीष्ट पर्यावरणाचे संतूलन राखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हाती घेतले आहे. मृद व जलसंधारण विभाग, बुलढाणा तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या अंतर्गत युथ वेल्फेअर असोसिएशन ऑफ इंडीया, बुलढाणा या संस्थेमार्फत गावशिवार जलसमृध्द करण्यासाठी जिल्हयात गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार तसेच नाला खोलीकरण व रुंदीकरण शिवाय फळबाग लागवड योजना राबविली जातात.

यावेळी रायपूर येथील शेतकरी श्री.संतोष राजपूत तसेच जलसंधारण अधिकारी जागृती चौधरी, मिताली लांडे, संस्था संचालक राजेश शेळके, ग्रामपंचायत सदस्य गजूभाऊ, सौदागर, अमोल व्यवहारे व इतर गावकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें