प्रामाणिकपणे सेवा बजावणारे निरज काकडे यांची केंद्रीय आयुष मंत्र्यांच्या पी.आर.ओ. पदावर नियुक्ती

Neeraj Kakade, who has served with integrity, has been appointed as the PRO of the Union AYUSH Minister.

बुलढाणा न्यूज टिम
चिखली तहसील कार्यालयात गेल्या कित्येक वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा बजावणारे आणि आपल्या कुशल संवाद कौशल्यामुळे नेहमीच चर्चेत असलेले निरज काकडे यांची भारत सरकारच्या केंद्रीय आयुष मंत्री यांच्या पब्लिक रिलेशन ऑफिसर (पी.आर.ओ.) या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाली आहे.

त्यांच्यावर मिळालेली ही जबाबदारी केवळ वैयक्तिक यश नसून, चिखली तालुक्यासाठीही अभिमानास्पद बाब ठरत असल्याचे प्रशांत ढोरे पाटील यांनी म्हटले आहे. निरज काकडे हे अत्यंत कार्यतत्पर, अभ्यासू आणि लोकाभिमुख महसूल विभागाचे प्रमुख कर्मचारी म्हणून परिचित आहेत. चिखली तहसील कार्यालयात कार्यरत असतांना त्यांनी अनेक शासकीय उपक्रम प्रभावीपणे राबवले असून, जनतेशी सुसंवाद साधून योजनांची अंमलबजावणी करण्यावर त्यांचा विशेष भर राहिला आहे.

मीडिया व जनसंपर्क क्षेत्रातील त्यांचा अनुभव, सामाजिक भान आणि स्पष्ट मांडणीची शैली यामुळेच त्यांची या उच्च पदावर नियुक्ती झाली असून, हे एकप्रकारे त्यांच्या कौशल्यांचे राष्ट्रीय स्तरावर केले गेलेले गौरवच आहे. केंद्रीय स्तरावर काम करताना निरज काकडे यांच्याकडून आयुष मंत्रालयाच्या कार्यपद्धती, उपक्रम आणि योजनांचा संदेश अधिक प्रभावीपणे देशभर पोहोचवण्याचे काम अपेक्षित आहे. या उल्लेखनीय नियुक्तीबद्दल विविध सामाजिक संघटनांकडून, स्थानिक जनतेकडून, तसेच त्यांच्या सहकारी वर्गाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. चिखलीसारख्या तालुक्यातून एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातून अशी थेट केंद्रीय झेप निश्चितच नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें