Congress’ drum beat protest in Malkapur, protesting against Mahavitaran Company
बुलढाणा न्यूज टिम
मलकापूर Malkapur- वीजपुरवठ्याशी संबंधित विविध समस्यांबाबत काँग्रेसच्या वतीने महावितरण कंपनीच्या कार्यालया समोर आज, शुक्रवार, दि.२० जून रोजी डफडे बजाओ आंदोलन करण्यात आले. शहरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. अनेक ठिकाणी तारा लोंबकळत आहेत. तसेच कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. नवीन रोहित्र बसवून दिले जात नाही. या समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या संदर्भात महावितरण कंपनीच्या अधिकार्यांना जाब विचारत विचारण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. आठ दिवसांत परिस्थिती न बदलल्यास कार्यालयाची तोड़फोड़ करण्याचा इशाराही देण्यात आला. यावेळी राज्य शासन आणि महावितरण कंपनीचा निषेधही नोंदविण्यात आला.
या आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू पाटील, बंडभाऊ चवरे, प्रमोद अवसरमोल, जावेद कुरेशी, संभाजी देशमुख, उस्मान मास्टर, रईस जमादार, कि सनराव पाटील, अनिल गांधी, अतामास्टर जमादार , सिद्धांत इंगळे, हरीश सिद्धीक सुपडू, फिरोज खान, तुषार पाटील, शेरू खान, जाकीर मेमन, विनय काळे, ज्ञानदेव तायड े, जावेद ठेकेदार, वाजिद खान, दिलीप गोळीवाले, ईश्वर भदाले, रामेश्वर गोरले, भूषण सनिसे, विजयबाप्पा निर्मल, भींगू दादा आदींचा सहभाग होता.