साहित्य जगत मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

Literary world Marathi literary conference concludes with enthusiasm

महाराष्ट्रातील विविध भागातील कवी व कवयित्रींची उपस्थिती

बुलढाणा न्यूज टिम
मेहकर
साहित्याला समर्पित असलेल्या साहित्य जगत या मासिकाच्या वतीने आयोजित तिसरे साहित्य जगत मराठी साहित्य संमेलन, कविश्रेष्ठ ना .घ.देशपांडे साहित्य नगरी,मे.ए.सो. कला व वाणिज्य महाविद्यालय, रामनगर ,मेहकर येथे आज १५ जून ला उत्साहात संपन्न झाले.

यावेळी उद्घाटक म्हणून मेहकर येथील सुप्रसिद्ध कवी व लेखक डॉ.विजय चर्‍हाटे (एम.बी.बी.एस. एम.डी. मेडिसिन) , संमेलनाध्यक्ष म्हणुन सुप्रसिद्ध लेखक, कवी व समीक्षक रामदास राजेगांवकर यांची उपस्थिती होते. तर, स्वागताध्यक्ष म्हणून परभणी येथील गीतकार , कवयित्री व लेखिका सुवर्णा मुळजकर, निमंत्रक म्हणून अक्षरशिल्प प्रकाशन अमरावतीचे विकास राऊत व प्रमुख उपस्थितीमध्ये कवी व लेखक किरण डोंगरदिवे, कवी व पत्रकार नागेश कांगणे, साहित्यिक व पत्रकार ज्ञानदेव मानवतकर आणि साहित्य जगत मासिकाच्या मुख्य संपादिका गिता भगवान राईतकर यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वरी आणि ग्रामगीता या ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. शाहीर ईश्वर मगर यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत गीत गायले. साहित्य वाचन आणि साहित्याच्या प्रसार व प्रचार करण्यासाठी सर्व साहित्यिकांनी तन-मन-धनाने साहित्य चळवळीला सहकार्य करण्याची गरज असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. त्यापुढील साहित्य जगत मराठी साहित्य संमेलन हे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये घेण्याचा निर्धार उपस्थित मान्यवर आणि रसिकांनी केला.

राज्यस्तरीय साहित्य जगत मराठी साहित्य संमेलनामध्ये प्रा. शांताराम हिवराळे, पुणे यांना साहित्य जगत साहित्य भूषण पुरस्कार , नामवंत साहित्यिकांना साहित्य माणिक पुरस्कार, नितीन पिसे पाटील यांना साहित्य जगत कृषी भूषण पुरस्कार, संदीप गवई ( मेहकर ) व अर्चना पौळ (परभणी ) यांचा विशेष सत्कार व पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. हे सुंदर नभ अन् सुंदर ही धरणी ह्या रामराव बोडखे , भापूर यांच्या पुस्तकाचे , व मानवधर्म या रामभाऊ कहाकर, देगांव यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

साहित्य जगत मराठी साहित्य संमेलनाच्या दुसर्‍या परिसंवादाचे होते . यामध्ये वाचनाने मानवी मनाची प्रगल्भता वाढते या विषयावर मान्यवरांनी प्रकाश टाकला. या सत्राच्या अध्यक्षा म्हणून प्रा. शारदा वानखेडे – चोपडे, परभणी तर, आकाशवाणी परभणी केंद्राच्या निवेदिका सौ.सुमेधा कुलकर्णी , अर्चना पौळ, संगीता सोनटक्के, विद्या सरपाते, हेमा राऊत, पारिजात देशमुख, सोनुने यांचा सहभाग होता. यावेळी साहित्य जगत मासिकाच्या संपादिका गीता राईतकर यांनी विद्यार्थिनींचा काव्य नभातील बाप हे पुस्तक देऊन स्वागत केले.

कवी संमेलन सत्राचे अध्यक्ष कवी संमेलनाचे सुप्रसिद्ध व ज्येष्ठ कवी सर्जेराव चव्हाण, बुलढाणा हे आहेत तर प्रमुख उपस्थितीमध्ये सुभाष उमरकर ( नाशिक), कलानंद जाधव ( हिंगोली), विद्या सरपाते ( गुंजखेडा), संगीता सोनटक्के ( तेल्हारा), पर्यावरण मित्र मोहन पवार (मेहकर ) द.स. धांडे (मेहकर) ईश्वरदादा मगर (हिवरा आश्रम) हे आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ३५ कवी व कवयित्रीने सहभाग घेतला होता. राज्यस्तरीय साहित्य जगत मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन भगवान राईतकर सर साहित्य मित्र मंडळ व साहित्य जगत परिवाराने केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें