व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य कार्यकारिणी सदस्य सिद्धेश्वर पवार यांना शांतिदुत सेवारत्न पुरस्कार जाहीर

Voice of Media State Executive Member Siddheshwar Pawar to be conferred with Shantidut Sewaratna Award

बुलढाणा न्यूज टिम
मेहकर – सिद्धहस्त पत्रकार, लेखक व सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश्वर पवार यांना यंदाचा शांतिदुत सेवारत्न पुरस्कार जाहीर केला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी सदर पुरस्काराने माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, स्व.श्रीमती पद्मश्री सिंधुताई सपकाळ, राही सरनौबत, शांताराम जाधव यांचेसह सिनेअभिनेते प्रशांत दामले,भरत जाधव,अभिनेता सचिन खेडेकर,आजी-माजी आमदार-खासदार यांच्यासह क्रीडा क्षेत्र, पत्रकारिता, प्रशाकीय सेवेतील अधिकारी व इतर मान्यवरांना या पुरस्काराने गौरविल्या गेलेले आहे.सिद्धेश्वर पवार हे रा.ना.पवार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष,पत्रकार , विदर्भ साहित्य संघाच्या मेहकर शाखेचे सचिव आहेत. स्वर्गीय अरविंद उमाळकर वृद्धाश्रमाचे उपाध्यक्ष आहेत. व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या देशपातळीवर कार्य करणार्‍या संघटनेचे ते राज्य कार्यकारिणी सदस्य आहेत. कोरोना काळात सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा होता. गोडवा ह्या गाजलेल्या वाचकप्रिय साप्ताहिक स्तंभाचे ते लेखक होय.

उत्कृष्ट सूत्रसंचालन ,प्रभावी वक्ता म्हणून सिद्धेश्वर पवार यांची ओळख असून,राहुल गांधी यांच्या मभारत जोडोफ यात्रेसह अनेक मुख्यमंत्री, मंत्री , मराठा क्रांती मोर्चाच्या सभांचे त्यांनी यशस्वी सुत्रसंचालन केलेले आहे. येत्या २६ जून २०२५ गुरुवार रोजी पुणे येथील L O C हॉस्पिटला नवी पेठ,एन.सी.फडके चौक निलायम टॉकीजचे जवळ सदाशिव पेठ पुणे येथे हा पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी त्यांचा उपरोक्त पुरस्काराने विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव केल्या जाणार असल्याचे शांतिदुत परिवाराचे अध्यक्ष सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ विठ्ठलराव जाधव यांनी कळविले आहे.सामाजिक, शैक्षणिक , पत्रकारिता यामधील उल्लेखनीय कार्याबद्दल पवार यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें