चेंगराचेंगरीत प्रकरणाला नवे वळण; विराट कोहलीविरुध्द गुन्हा दाखल
New twist in stampede case; Case registered against Virat Kohli
बुलढाणा न्यूज टिम
बेंगळूरु चेंगराचेंगरी प्रकरणी पोलीसांनी आज शुक्रवारला (६ जून २०२५) रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु आरसीबीचे मार्केटिग प्रमुख निखील सोसाळे यांच्यासह अजून तिघाजणांना अटक केली आहे. या दरम्यान कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे सचिव शंकर व कोषाध्यक्ष जयराम यांच्या देखील घरी पोलिसांनी भेट दिली परंतु यावेळी ते पोलिसांना घरी आढळून आले नाही. त्यामुळे त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. आता या प्रकरणाला नविन वळण आले आहे. विराट कोहलीविरुध्दात देखील गुन्हा दाखल A case has also been registered against Virat Kohli. करण्यात आला आहे.
बंगळूरुमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात Stampede case क्रिकेटचा खेळाडू विराट कोहली देखील गुन्हा दाखल झाल्यामुळे वादाच्या भोवर्यात सापडला आहे. एम चिन्नास्वामी स्टेडीयमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत अकरा जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले. या प्रकरणात अनेकांना या आधीच अटक करण्यात आली होता.
क्यूबन पार्क पोलीस ठाण्यात अटक करण्यात आलेल्यांची पोलीस कसून चौकशी घेत आहे. चेंगराचेंगरीत निष्काळजीपणाचे कारण, सुरक्षा मानकांशी संबंधीत बाबी, कार्यक्रम परवानगी याबाजूने देखील क्यूबन पार्क पोलिस स्टेशनला चौकशी सुरु आहे.