कर्जमुक्तीसाठी मलकापूर येथील जनता कला वाणिज्य महाविद्यालयात शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी घेतला ‘धडा’

किसान ब्रिगेडच्या माध्यमातून कर्जमुक्तसाठी लाखो अर्ज

बुलढाणा न्यूज मलकापुर
महायुती शासनाजवळ सर्व योजनांसाठी मोठ्या प्रमाणात कोटींने पैसा उपलब्ध आहे. मात्र शेतकर्‍यांच्या मालाला भाव देण्यासाठी पैसा नाही, शेतकर्‍यांच्या अडचणी सोडविण्याकरिता शासनाला वेळ नाही, त्यामुळे दळभद्री महायुती शासनाला धडा शिकवणे गरजेचे झाले असल्याचा इशारा शेतकरी नेते किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे Farmer leader Prakash Pohare, National President of Kisan Brigade यांनी केले. शेतकरी कर्जमुक्तीसाठी बुलढाणा जिल्ह्यातून शेकडो शेतकर्‍यांनी अर्ज सादर करून कर्जमुक्तीसाठी हाक दिली आहे. याच अभियानाचा आढावा घेण्यासाठी ते बुधवार, दि. ४ जून रोजी २०२५ रोजी मलकापूर येथे आढावा बैठकीत जनता कला वाणिज्य महाविद्यालयात मार्गदर्शन केले.

यावेळी प्रमुख उपस्थिती अँड.साहेबराव मोरे आंदोलन सम्राट व माजी नगराध्यक्ष अँड.हरीश रावळ, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर शर्मा, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सोपानभाऊ शेलकर, दिवाकर गावंडे, प्रदीप गावंडे, राजेश मावळे, न.प.चे.मा.गटनेते राजेंद्र वाडेकर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख दीपक चांभारे पाटील, शहरप्रमुख गजानन ठोसर, कामगार सेना शहर प्रमुख हरीदास गणबास, सामाजिक कार्यकर्ते विलास खर्चे, माजी नगरसेवक अनिल गांधी यांचे सह आदींची उपस्थिती होती. मलकापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या किसान ब्रिगेडच्या महत्त्वपूर्ण बैठक व आढावा बैठकीत प्रसंगी शेतकरी नेते प्रकाश पोहरे पुढे म्हणाले की शेतकर्‍याचा माल घेताना त्याला कशाप्रकारे वेढीस धरण्यात येते. या महायुती शासनाला शेतकर्‍यांनी दंडुका घेऊन त्यांना त्यांची जागा दाखविणे गरजेचे असून कर्जमाफी करिता आता आम्ही स्वस्त बसणार नाही. टप्प्याटप्प्याने मुंबईकडे जाऊन विविध आंदोलने किसान ब्रिगेडच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या सहकार्याने करणार असल्याचा इशारा शेतकरी नेते किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी केले.

पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की, किसान ब्रिगेडच्या माध्यमातून व शेतकर्‍यांच्या सहकार्यातून किसान कर्ज मुक्ती अभियानाचा संकल्प हातात घेतला आहे . या शासनाला धडा शिकवण्यासाठी शेतकर्‍यांच्या व किसान कर्ज मुक्ती अभियानाच्या माध्यमातून वेगवेगळी आंदोलने करून सरकारला भेटीस धरण्यात येणार आहे. त्याशिवाय या सरकारला जाग येणार नसल्याचेही त्यांनी महायुती शासनाचा खरपूस समाचार घेतला. शेतकर्‍यांनी आतापर्यंत संपूर्ण राज्यात सुमारे दहा लाख किसान कर्ज मुक्ती अभियानाचे अर्ज भरण्यात आले आहेत. असे सांगितले.

तर शेतकरी नेते अँड साहेबराव मोरे,व शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर शर्मा यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शेतकर्‍यांना नेहमीच शासनाकडे भिक मागावी लागते. सर्व बाबींसाठी शासन लाखो करोडो रुपये खर्च करीत आहे. मात्र शेतकर्‍यांच्या मालाला भाव नाही, नुकसान भरपाई नाही, पिक विम्याची भरपाई नाही, दुबार पेरणीचे पैसे नाही, अतिवृष्टीचे पैसे नाही, शेतकर्‍यांनी जगायचे तरी कसे ?त्यामुळेच शेतकरी आत्महत्या करीत आहे. शेतकर्‍यांना न्याय न देता महायुती शासन शेतकर्‍यांच्या विरुद्धच आहे. हे दिसत असून आता या महायुती शासनाला धडा शिकवण्याकरिता शेतकर्‍यांनी जोमाने कामाला लागून किसन ब्रिगेडच्या माध्यमातून व प्रकाशभाऊ पोहरे यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या किसान कर्ज मुक्ती अभियानामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी यांनी सहभागी होऊन कर्जमाफी करिता विविध आंदोलनेसाठी सज्ज राहावे. असे त्यांनी यावेळी सांगितले. किसान ब्रिगेडच्या महत्त्वपूर्ण बैठक व आढावा बैठकीमध्ये मलकापूर तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. यामध्ये अनेकांनी आपल्या अडीअडचणी व समस्या सादर केल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञा.ना हिवाळे सर, तर आभार प्रदर्शन संजय सावळे (पाटील) सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता किसान ब्रिगेडचे पदाधिकारी यासह आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें