धर्मवीर संजय गायकवाड यांची शिवसेना जिल्हा संघटकप्रमुखपदी निवड

Dharamveer Sanjay Gaikwad elected as Shiv Sena District Organiser

बुलढाणा न्यूज 
महाराष्ट्र राज्यात होणार्‍या स्वराज संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर शिवसेना पक्षाला जिल्हयात अधिक बळकट बनवण्याची जवाबदारी बुलढाण्याचे आमदार तथा संजय गायकवाड यांच्या ख़ांद्यावर टाकण्याता आली आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आशयाचे नियुक्तीपत्र आ.संजय गायकवाड यांना मंगळवार, दि.३ जून २०२५ रोजी मुंबई येथे दिले.

प्राप्त मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा संपर्क प्रमुख पदाच्या नियुक्त्या पक्षाच्या वतीने जाहिर करण्यात आल्या आहेत. तसेच मागील सात वर्षात आ.संजय गायकवाड यांनी जिल्हाभरात शिवसेनापक्षाची मोर्च बांधणी अतिशय नियोजनबध्द पध्दतीने केली आहे. तसेच जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागात त्यांनी उभारलेल्या विकासाच्या झंझावातात अनेकांनी त्यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश ही केला आहे. त्यामुळे जिल्हा शिवसेना ही भक्कम झाली आहे. येणार्‍या काळात स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणूका होणार आहे. या निवडणूकीत शिवसेनेला प्रचंड यश मिळावे, यासाठी कुशल संघटन, जिद्द, चिकाटी पाहता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आ.संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत हि संधी त्यांना प्रदान केली आहे.

जिल्हयाभरातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व इतर स्वराज संस्थेत शिवसेना पक्षाच्या जास्तीत जास्त जागा निवडणूक आणण्यासाठी त्यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली आहे. या पदाच्या अधिनस्थ असलेल्या अंगिकृत संघटना आहेत. त्या देखील धर्मवीर आ. संजय गायकवाड Dharmaveer A. Sanjay Gaikwad यांच्या नेतृत्वात काम करणार आहेत. या निवडी बद्दल सर्व पदाधिकारी, मित्र परिवाराच्या वतीने धर्मवीर आ. संजय गायकवाड यांचे स्वागत केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें