मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारला अकोल्यात

Chief Minister Devendra Fadnavis inaugurated and inaugurated various development works worth Rs 3,000 crore in Akola on Wednesday

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारला अकोल्यात

तीन हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

बुलढाणा न्यूज टिम

तीन हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण बुलढाणा न्यूज टिम महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे येत्या बुधवार, दि.११ जून २०२५ रोजी अकोला दौर्‍यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते तब्बल ३ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण होणार आहे. यानिमित्ताने जनता-कार्यकर्ता संवाद संमेलन व जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.सद्यस्थितीत अकोला जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या भव्य कार्यक्रमाचे आयोजन अकोला येथील क्रिकेट क्लब मैदानावर दुपारी एक वाजता करण्यात आले आहे. या दरम्यान अकोला पूर्व, अकोट, मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील विविध कामांचा शुभारंभ, लोकार्पण आणि सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचा व्यापक उद्देश या दौर्‍यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी अकोला येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने जय्यत तयारी सुरु केली आहे. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, खामगांव विधानसभेचे आमदार तथा अकोला जिल्हयाचे पालकमंत्री अ‍ॅड.आकाश भाऊसाहेब फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार हरीश पिंपळे, प्रकाश भारसाकळे, वसंत खंडेलवाल यांच्यासह इतर अनेक मान्यवरांकडून पुढाकार घेण्यात येत आहेत.

महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे येत्या बुधवार, दि.११ जून २०२५ रोजी अकोला दौर्‍यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते तब्बल ३ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण होणार आहे. यानिमित्ताने जनता-कार्यकर्ता संवाद संमेलन व जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.सद्यस्थितीत अकोला जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या भव्य कार्यक्रमाचे आयोजन अकोला येथील क्रिकेट क्लब मैदानावर दुपारी एक वाजता करण्यात आले आहे.

या दरम्यान अकोला पूर्व, अकोट, मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील विविध कामांचा शुभारंभ, लोकार्पण आणि सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचा व्यापक उद्देश या दौर्‍यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी अकोला येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने जय्यत तयारी सुरु केली आहे. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, खामगांव विधानसभेचे आमदार तथा अकोला जिल्हयाचे पालकमंत्री अ‍ॅड.आकाश भाऊसाहेब फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार हरीश पिंपळे, प्रकाश भारसाकळे, वसंत खंडेलवाल यांच्यासह इतर अनेक मान्यवरांकडून पुढाकार घेण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें