मलकापूर काँग्रेसने काढलेला गाढव मोर्चाला यश कायम स्वरूपी मुख्याधिकारी म्हणून येणार उमरगा नगर पालिकेतून रामकृष्ण जाधवर

Malkapur Congress’ donkey march a success
Ramakrishna Jadhav from Umarga Municipal Corporation will be the permanent Chief Officer

बुलढाणा न्यूज टिम मलकापूर

स्थनिक नगर पालिकेला अखेर कायम स्वरूपी मुख्याधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विकासाच्या मुद्यावर काँग्रेसने काढलेला गाढव मोर्चा आणि पालिकेत केलेल्या आंदोलनाला यामुळे यश आले आहे.

अनेक वर्षांपासून मलकापूर नगर पालिकेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने शहरातील मुलभूत सुविधांकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या समस्येमुळे काँग्रेसने आक्रमक आंदोलनाचा इशारा देत गुरुवार, दि.२९ मे २०२५ रोजी गाढव व घागर मोर्चा काढला होता. त्यानंतर पालिकेत घागर फोडून आंदोलन करत निषेध नोंदविला होता. काँग्रेसच्या या मोर्चाची दखल घेत राज्यपालांच्या आदेशाने व शासनाच्या उपसचिव नगर विकास मंत्रालयाच्या प्रियंका कुळकर्णी- छापवाले यांच्या पत्राद्वारे मुख्याधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. New Chief Officer Ramakrishna Jadhav नवे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर हे धाराशिव जिल्ह्यातील उमरगा नगर पालिकेतून मलकापूर येथे रुजू होणार आहेत. Umarga will be joining Malkapur from the Municipal Corporation. मुख्याधिकारी गजानन भोयर यांची बदली करण्यात आली आहे. कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने पालिकेचा दुर्लक्षित कारभार अनेक वेळा चर्चेत आला आहे. परंतु, आता मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर पदभार स्विकारणार आहेत. शहरातील पाणी पुरवठा, पथदिवे, घनकचरा व्यवस्थापन, रस्ता, नाल्या या समस्यांना नवनियुक्त मुख्याधिकार्‍यांनी प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें