पुलावरून वाहून गेलेल्या ७० वर्षीय शेतमजूराचा अद्याप ही शोध सुरुच

The search is still on for a 70-year-old farm worker who was swept off a bridge.

प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे घारोड गावकर्‍यांत असंतोष

https://buldhananews.com

खामगाव
गेल्या सात दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आता गंभीर स्वरूप धारण केले असून, काल २८ मे रोजी सायंकाळी खामगाव तालुक्यातील घारोड गाव परिसरात ढगफुटी सदृश्य पावसाने कहर केला होता. या पावसामुळे घारोड नदीला अचानक पूर आल्याने त्याचा फटका गावातील नागरिकांना बसला.याच दरम्यान, गावातील ७० वर्षीय शेतमजूर धोंडीबा इंगळे Agricultural laborer Dhondiba Ingle हे कामावरून परत येत असताना नदीवरील पुलावरून जात असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे सदर ७० वर्षीय वृध्द पुराच्या पाण्यात वाहून गेला.

ही दुर्दैवी घटना गावात खळबळ उडवून देणारी ठरली आहे. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी तातडीने जिल्हा प्रशासनाला रात्रीच दिली होती. मात्र, दुसर्‍या दिवशी सकाळीपर्यंत प्रशासनाचा एकही अधिकारी किंवा एनडीआरएफची बचाव पथक घटनास्थळी पोहोचलेली नव्हती. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.दरम्यान, धोंडिबा इंगळे यांचा शोध अद्याप सुरु असून ग्रामस्थ आणि स्थानिक स्वयंसेवक त्यांच्या शोधासाठी प्रयत्न करत आहेत. प्रशासनाच्या ढिसाळ प्रतिसादामुळे गावकर्‍यांमध्ये असंतोष पसरला असून, या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची मागणी होत आहे.

.. आता शेतकर्‍यांना वाटप पत्राची नोंदणी सहजपणे करता येणार

अरे बाप रे… मलकापूरात उद्या गाढव मोर्चा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें